Dino Morea : नितेश राणे ज्याला म्हणाले होते ‘बीएमसीचा सचिन वाझे’, ‘तो’ अभिनेता मोदींच्या पार्टीत
भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. दिनो मोरिया हा मुंबई महापालिकेचा सचिन वाझे आहे. त्याची सखोल चौकशी केल्यास अनेक पेग्विन बाहेर पडतील.आमच्याकडे त्याबाबत पुरावे असल्याचा आरोप नितेश राणे यांनी ट्विट करून केला होता.
ADVERTISEMENT
Dino Morea Visit Pm Narendra Modi Christmas Party : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 25 डिसेंबरला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाने (Dino Morea) हजेरी लावली होती. या संबंधित फोटोही व्हायरल झाले होते. या दरम्यान एकेकाळी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी याच दिनो मोरियाला ‘बीएसमीचा सचिन वाझे’ म्हटले होते. त्यामुळे आता नितेश राणे यांनी आरोप केलेल्या अभिनेता दिनो मोरियासोबत पंतप्रधान मोदींचा फोटो झळकल्याने भाजपची मोठी पंचाईत झाली आहे. (dino morea attend pm narendra modi new delhi home christmas party nitesh rane allegation)
ADVERTISEMENT
25 डिसेंबरला ख्रिसमस डेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ख्रिश्चन समुदायातील अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये काही अभिनेत्यांचा देखील समावेश होता.बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया देखील या ख्रिसमस पार्टीला पोहोचला होता. त्याने पंतप्रधान मोदींसोबत ख्रिसमस पार्टीचा आनंद लुटला होता. या संबंधित फोटो देखील दिनो मोरियाने सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
हे वाचलं का?
दिनो मोरियाने मोदींसोबत ख्रिसमस पार्टी साजरी केल्याचे काही फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनला तो लिहतो की, यंदाची ख्रिसमस पार्टी खूपच सूंदर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टीला बोलावलेत त्याबद्दल तुमचे आभार. तुमची भेट आणि तुमच्याशी संवाद खूपच संस्मरणीय होता, असे दिनो म्हणाला आहे.
हे ही वाचा : महिलांच्या शौचालयात भर रात्री आरडाओरड अन्… साताऱ्यात भयंकर प्रकार
येशू ख्रिस्ताचे जीवन हे करुणा आणि सेवेवर केंद्रित असलेला संदेश आहे. “ख्रिसमस हा एक दिवस आहे, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करतो. त्यांच्या जीवनातील संदेश आणि मूल्ये लक्षात ठेवण्याचा हा एक प्रसंग आहे. सर्वांसाठी न्याय देणारा सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केले. हे आदर्श आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासासाठी मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करत आहेत,असे यावेळी ख्रिश्चन समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
ADVERTISEMENT
Dino is the Waze of BMC !!
If one digs more … lot of penguins will come out running..
We have the proofs!!— nitesh rane (@NiteshNRane) July 3, 2021
ADVERTISEMENT
दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दिनो मोरियाला त्यांच्या निवासस्थानी ख्रिसमस पार्टीला बोलावले होते. त्याच दिनो मोरियावर एकेकाळी भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. दिनो मोरिया हा मुंबई महापालिकेचा सचिन वाझे आहे. त्याची सखोल चौकशी केल्यास अनेक पेग्विन बाहेर पडतील.आमच्याकडे त्याबाबत पुरावे असल्याचा आरोप नितेश राणे यांनी ट्विट करून केला होता.
हे ही वाचा : Virat Kohli शी पंगा घेणारा ‘हा’ खेळाडू IPL मधून ‘आऊट’, कारण…
इतकंच नाही तर नितेश राणे यांनी विधानसभेतील भाषणात देखील दिनो मोरियावर आरोप केले होते. मुंबई महापालिकेतील व सरकारशी संबंधित कामं चुटकीसरशी करून देतो, असं लोकांना सांगणारा हा दिनो मोरिया आहे कोण? तो सरकारचा जावई आहे का? कलाकार आहे, दोन-चार चित्रपट केले, आता काय करतो? हा कोणाच मित्र आहे. कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या सारख्याच लोकांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते.
Yaad hai 👇
Bullseye 😎 pic.twitter.com/fVNnudgpoK
— nitesh rane (@NiteshNRane) July 2, 2021
दरम्यान आता त्याच दिनो मोरियाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमस पार्टीचे निमंत्रण दिल्याने व त्यांच्यासोबत फोटो काढल्याचे भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT