जळगाव : शिंदेंचे आमदार चिमणराव पाटलांच्या मुलाचा पराभव; पॅनेलचाही धुव्वा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jalgaon APMC Election Result Update News
Jalgaon APMC Election Result Update News
social share
google news

जळगाव : राज्यभरात आज (29 एप्रिल) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात जळगाव जिल्ह्यातील पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार चिमणराव पाटील (Chinmanrao Patil) यांच्या पॅनेलचा मोठा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मार्केट बचाव पॅनलने आमदार चिमणराव पाटील यांच्या किसान पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष गोष्ट म्हणजे यात चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांचाही धक्कादायक पराभव झाला आहे. अमोल पाटील हे बाजार समितीचे विद्यमान सभापती होते. (Jalgaon APMC Election Result Update News)

ADVERTISEMENT

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची ठरली होती. याच कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटील आणि त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. मात्र सतीश पाटलांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर दोघांची उमेदवारी वैध ठरली होती. यावेळी सत्याने असत्यावर विजय मिळवला आहे, यापुढील काळात आमदार चिमणराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीत देखील पराभूत करू, असा आत्मविश्वास डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला होता.

जळगावमध्ये महाजनांचे वर्चस्व, भुसावळमध्ये खडसेंना धक्का :

दरम्यान, जळगाव जिल्हातील 6 पैकी 4 कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाचे विजय मिळविला तर 2 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर बाजार समितीत भाजप प्रणित सहकार पँनलला 18 पैकी 18 जागा मिळाल्या. तर , भुसावळ बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. इथे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या पॅनेलला 15 तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

हे वाचलं का?

जळगावमधील 12 पैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल :

  • जामनेर – भाजपा – 18
  • भुसावळ – भाजपा – 15, महाविकास आघाडी – 3
  • चाळीसगाव – भाजप 15 , महाविकास आघाडीला 3
  • पारोळा – महाविकास आघाडी – 15, शिवसेना -3
  • चोपडा – भाजपा-शिवसेना – 9, महाविकास आघाडी – 9
  • रावेर – महाविकास आघाडी – 13, भाजप-शिवसेना – 5

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT