लाइव्ह

Maharashtra Breaking News : भाजपात प्रवेश देण्याची कधी विनंती केली नाही- एकनाथ खडसे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर महाविकासाआघाडीच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. त्यासोबतच राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट’ मोहिमेची आज सुरुवात केली. यामाध्यमातून राज्य सरकारच्या दहा महत्त्वपूर्ण योजनांचा प्रचार घरोघरी होणार आहे. शिवसैनिक दररोज 15 कुटुंबांना भेट देणार असून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसह योजनेत सामावून न घेतलेल्या कुटुंबांनाही मदत मिळणार आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 01:05 PM • 10 Sep 2024

    Maharashtra News : मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार सुरू

    मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी ते लावून धरणार आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून जरांगे हे पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत.

     

  • 01:04 PM • 10 Sep 2024

    मी भाजपचा सदस्य नाही, त्यामुळे कोअर कमिटीत जाण्याचा प्रश्न नाही- खडसे

    “नड्डा मोठे की भाजपचे राज्यातील नेते मोठे असा मनात प्रश्न आहे. मी भाजपमध्ये कधीही प्रवेश केला नाही. मी शरद पवारांच्या पक्षातच आहे. मी भाजपचा सदस्य नाही, त्यामुळे कोअर कमिटीत जाण्याचा प्रश्न नाही,” असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय.

  • 12:59 PM • 10 Sep 2024

    Maharashtra News : भाजपात प्रवेश देण्याची कधी विनंती केली नाही- एकनाथ खडसे

    “भाजपात प्रवेश देण्याची कधी विनंती केली नाही. काहींनी माझ्या प्रवेशाला विरोध केला. महाजन आणि फडणवीसांकडून विरोध असू शकतो,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT