लाइव्ह

Maharashtra Breaking News : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर! स्वत:च्याच बंदुकीतून सुटली गोळी अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आले असता हा वाद झाला. लक्ष्मण हाके यांनी दारु प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला. यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसतात. आता हाके यावर प्रत्रकार परिषद घेऊन बोलले आहेत.

ADVERTISEMENT

लक्ष्मण हाके म्हणाले की, 'मला बदनाम करण्याचा काहींचा डाव आहे. माझ्याविरोधातील कट पूर्वनियोजित होता. मी वैद्यकीय तपासणी केली, घाबरलो नाही. गोळ्या घातल्या तरी आंदोलन थांबवणार नाही. संभाजीराजे छत्रपतींनी माझ्या अंगावर माणसं घातली.' असे थेट आरोप लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजे छत्रपतींवर केले आहेत. 

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 11:39 AM • 01 Oct 2024

    Maharashtra News : अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर गोळीबार

    अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या.

     

  • 09:22 AM • 01 Oct 2024

    अभिनेता गोविंदाकडून मिसफायर! स्वत:च्याच बंदुकीतून सुटली गोळी अन्...

    अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालं आहे. त्याच्या स्वत:च्याच बंदुकीतून सुटली गोळी आहे. ही घटना पहाटे 4.45 वाजता घडली. गोविंद बाहेर जाण्याच्या तयारीत होता यावेळी त्याने आपली लाइसेन्स रिव्हॉल्वर चेक केली असता हा प्रकार घडला. गोविंदाच्या गुडघ्याजवळ गोळी लागली असून त्याच्यावर सध्या मुंबईतील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
     

follow whatsapp

ADVERTISEMENT