Maharashtra Breaking News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये- प्रकाश आंबेडकर
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे.
त्याचबरोबर 1 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मीट अप मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सोशल मीडिया सेलचा मेळावा घेतला जाणार आहे. यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शरद पवारांसोबतच जयंत पाटील, सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित असणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक आहे.
ADVERTISEMENT
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
- 02:19 PM • 30 Sep 2024
Maharashtra Weather : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये- प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की ओबीसीचा आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये. सरकारला मराठा समाजाचा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळ आरक्षण द्यावे, मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये
- 12:25 PM • 30 Sep 2024
Maharashtra Weather : मविआची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक सुरू
महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक सुरू आहे. मविआच्या सलग दोन दिवस जागावाटपसंदर्भात बैठका होणार आहेत. गेल्या आठवड्यात मविआच्या नेत्यांनी 288 जागांचा आढावा घेतला होता.
- 12:23 PM • 30 Sep 2024
Maharashtra News : मुंबई-नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको
धनगरांना आदिवासींमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. आंदोलकांनी रस्त्यावर उतरत मुंबई-नाशिक महामार्ग रोखला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे.
- 09:48 AM • 30 Sep 2024
Mumbai Local Update : पश्चिम रेल्वे सेवा उशीराने धावतेय, प्रवाशांची मोठी गर्दी
सहाव्या मार्गिकेचे काम सुरू झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या उशिराने धावत आहे. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल उशिराने धावत आहेत.कांदिवली मालाड गोरेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. लोकल उशिराने धावत असल्याने प्रवासी नाराज झाले आहेत.
- 09:46 AM • 30 Sep 2024
Maharashtra Weather: येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रीय
येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची उघडीप असणार आहे. पावसासाठी पोषक स्थिती नसल्याने पावसाची शक्यता नाही. मात्र गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळ राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र परतीच्या प्रवासाला अजून पोषक वातावरण नाही. पुणे आणि मुंबईतून १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान मोसमी वारे परततील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- 09:45 AM • 30 Sep 2024
म्हसवड येथील कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरेंनी बंदुकीची ॲक्शन करत नाव न घेता पवारांवर केली टीका
म्हसवड येथे आ. जयकुमार गोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास 20 हजाराहून अधिक महिला उपस्थिती लावली. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी व्यासपीठावर येऊन बंदुकीची ॲक्शन करत निशाणा साधलाय. बंदुकीच्या ॲक्शन विषयी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर हा रोख शासनाने राबवलेल्या योजनांच्या विरोधात काम करणारे आणि मान खटाव तालुक्यातील विकासाच्या आड येणाऱ्यांवर होता. समजणे वालो को इशारा काफी है असे सांगत बारामतीच्या दिशेने हात वारे करत त्यांनी शरद पवारांच्या वर नाव न घेता टीका केली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT