Maharashtra News Live : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक! मनू भाकर-सरबज्योत सिंगने रचला इतिहास
Maharashtra Breaking News Live : वाचा महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडींबद्दलची माहिती, हवामान अपडेट्स लाईव्ह...
ADVERTISEMENT
Maharashtra Live Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळू लागले आहे.
ऑक्टोबरमध्ये विधानसभा होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दोन्ही आघाड्यातील मित्रपक्षांकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून यावर चिंतन मंथन सुरू आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवरही काम सुरू आहे.
ADVERTISEMENT
दुसरीकडे महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दाही तापला नाही. मनोज जरांगे पाटील हे आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा देत आहे.
या सगळ्या संदर्भातील ताजे अपडेट्स आणि विश्लेषण वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये....
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 01:37 PM • 30 Jul 2024
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक! मनू भाकर-सरबज्योत सिंगने रचला इतिहास
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक मिळाले आहे. दोन्ही पदक हे नेमबाजीत मिळाले आहेत. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओह ये जिन यांचा 16-10 असा पराभव करून पदक जिंकले. यासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिली नेमबाज ठरली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. तर, 22 वर्षीय सरबज्योतचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे.
- 01:04 PM • 30 Jul 2024
Maharashtra Live News : पंकजा मुंडे-प्रकाश आंबेडकरांची भेट
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील महापूर येथे यात्रा असताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. पंकजा मुंडे यांनी या यात्रेला शुभेच्छा दिल्या. लातूर येथे आयोजित भाजपच्या मराठवाडा विभागाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे लातूरकडे जाताना ही भेट झाली.
- 12:51 PM • 30 Jul 2024
Maharashtra News : "प्रवीण दरेकर अध्यक्ष असेल्या बँकेला तीन एकर जमीन का?"
मुंबै बँकेला जमीन देण्याचा निर्णय घेत, तसा शासन निर्णय काढण्यात आला. यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला सवाल केला आहे.
"भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेला तीन एकर जमीन का देण्यात येत आहे? महायुती सरकार हे जनतेचं आहे की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी आहे? आधी शासन निर्णय काढला, मग शासकीय संकेस्थळावरून का हटवला? चोरी जनतेपासून लपविण्यासाठी शासन निर्णय संकेतस्थळावरून हटवला आहे की निर्णय ही रद्द करण्यात आलेला आहे? याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे.
- 12:10 PM • 30 Jul 2024
Maharashtra News: 'मातोश्री' बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन!
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते करत आहेत. त्यांचे मातोश्रीबाहेर आंदोलन सुरू आहे. उद्या शरद पवारांच्या घराबाहेर दुपारी 12 वाजता आंदोलन करणार असल्याचे मराठा आंदोलकांनी सांगितले. तसंच, भूमिका स्पष्ट करा नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकू असंही ते म्हणाले आहेत.
- 10:13 AM • 30 Jul 2024
Maharashtra News Live : उत्तम जानकरांनी शरद पवारांकडे काय केली मागणी?
'अजित पवार परत राष्ट्रवादीत आले, तर त्यांना घेऊ नये. त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल', अशी टीका उत्तम जानकर यांनी केली.
सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अनेक आमदार घरवापसी करत आहेत. अजित पवारांची हालचाल तशी दिसून येत आहे का? असे विचारले असता उत्तम जानकर म्हणाले की, "चर्चा तर तशी सुरू आहे. पण माझं मत आहे की, या राज्याला जेव्हा आग लागली. तेव्हा हा बिबट्या पळून गेला आणि आता जंगलाची आग मतरूपी पाऊस पडून मतदारांनी विझवली आहे. अशा परिस्थितीत हा बिबट्या पुन्हा शिकारीसाठी माघारी आला, तर इथला राष्ट्रवादीचा सच्चा सैनिक बिथरेल. त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल", असे जानकर म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT