लाइव्ह

Maharashtra Breaking News : अजित पवारांच्या जुन्नरमधील कार्यक्रमला काळे झेंडे दाखवत भाजपचा विरोध!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे कुठे साखर तर कुठे पेढे वाटून जल्लोष करण्यात येत आहे. लाभार्थी महिलांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे 'दुर्दैवी घटना घडली, महांतांकडून एक विधान देण्यात आले. पण सरकार गुलाबी रांगाखाली लपणार नाही,' असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी टीका केली. याच महंतांनी 2018 साली मुस्लिम समाज धर्मगुरूंना मंचावर बसवून कीर्तन करत होते, आज सरकार जाणार म्हणून हे सगळं घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 12:12 PM • 18 Aug 2024

    Pune News : पुण्यातील वाघोली परिसरात टोळक्याने पेटवल्या गाड्या!

    पुण्यातील वाघोली परिसरातील धक्कादायक प्रकार घडलाय. वाघोली परिसरात टोळक्याने गाड्या पेटवल्या. चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहशत माजवण्याच्या हेतुने गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे.

  • 12:03 PM • 18 Aug 2024

    Satara News : शिंदे- फडणवीस आज सातारा दौऱ्यावर!

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थींच्या सन्मान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 50 हजार महिला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील काही मोजक्या लाभार्थी महिलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.

  • 09:12 AM • 18 Aug 2024

    Beed News : बीडच्या माजलगावमध्ये महिलांचा कँडल मार्च

    कोलकता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि केलेल्या हत्येच्या निषेधार्थ, बीडच्या माजलगावमध्ये सर्व क्षेत्रातील महिलांनी एकत्र येत, कॅंडल मार्च काढला. शासनाने यातील नराधम आरोपींना कठोर शिक्षा करावी, त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षीततेसाठी शासनाने कडक कायदा करावा, ही मागणी घेऊन हा कॅडल मार्च काढला होता. दरम्यान या कॅडल मार्चमध्ये शहरातील प्रतिष्ठीत महिला डॉक्टर तसेच इतर महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

  • 09:09 AM • 18 Aug 2024

    Ajit Pawar : अजित पवारांच्या जुन्नरमधील कार्यक्रमला काळे झेंडे दाखवत भाजपचा विरोध!

    अजित पवारांच्या जनसमान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावल जात असल्याचा आरोप करत अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत असे बुचकेंनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली आहे
     

  • ADVERTISEMENT

  • 09:04 AM • 18 Aug 2024

    Kolhapur News : कोल्हापुरातील आंबा घाटात आढळले 2 तरुणांचे मृतदेह

    कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटातील खोलदरीत 2 तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यातील एक तरुण हा सांगलीतील तर दुसरा तरुण निपाणी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT