Maharashtra Breaking News : बदलापूर प्रकरणातील आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी राजकीय नेत्यांकडून पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदलापुरात आज इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT
अदानी प्रकरणी तपासासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे अधिक ठळकपणे सांगण्यासाठी आज (ता. २१) देशभरात वीस ठिकाणी पत्रकार परिषद घेणार असल्याचे काँग्रेसतर्फे आज सांगण्यात आले. अदानी प्रकरणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याने याचा सखोल तपास आवश्यक असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज ‘एक्स’वर सांगितले. हिंडेनबर्ग अहवालात अदानी उद्योगसमूहाच्या आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त झाल्यानंतर काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाडी ( ता.हवेली) येथील निवासस्थानांवर सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) मंगळवारी छापे टाकले होते. यानंतर 16 तासांहून अधिक चौकशीनंतर मंगलदास बांदल यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
- 12:12 PM • 21 Aug 2024
Badlapur News: बदलापूर प्रकरणातील आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपीने आणखी काही मुलींसोबत लैंगिक शोषण आणि घाणेरडे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. या संशयाच्या आधारे पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीच्या आधारे आरोपीने मुलींना काय सांगितले, त्याने त्यांच्याशी कसे वागले, त्यांच्यावर कसा अत्याचार केला, याचा सखोल तपास करण्याची गरज आहे. ही मागणी मान्य करत न्यायालयाने आरोपींना 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपीच्या अन्य गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.
- 11:38 AM • 21 Aug 2024
Badlapur : बदलापूर लैंगिक अत्याचार खटला चालविण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती
- बदलापूर लैंगिक अत्याचार खटला चालविण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती
- 13 तारखेला बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती
- त्यानंतर बदलापूरमध्ये रेल रोको व तोडफोड करत स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आले होते
- नागरिकांचे आंदोलन पाहता दीपक केसरकर, गिरीश महाजन यांनी काल ही केस फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचे सांगितले
- तसेच उज्ज्वल निकम या केसवर काम करणार असल्याचे केले होते आव्हान
- 11:34 AM • 21 Aug 2024
Badlapur News : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आंदोलन करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील गुडलक चौकामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पवार गटाकडून आंदोलन केलं जाणार आहे.
- 09:23 AM • 21 Aug 2024
Badlapur News : बदलापूर स्टेशनबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आज इंटरनेट सेवाही राहणार बंद
बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेलरोको केला होता. पालक जवळपास १० तास रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून होते. त्याचीच खबरदारी म्हणून आज देखील पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्टेशनबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सकाळपासूनच पोलीस बदलापूर स्टेशनच्या बाहेर तैनात आहेत. रेल्वेसेवा सध्या सुरळीत सुरु आहे. खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. तसंच आज बदलापूरमध्ये इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे.
- 09:12 AM • 21 Aug 2024
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर
- आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा तर उद्या येवला, मनमाड आणि निफाड मध्ये घेणार सभा
- आदित्य ठाकरे उद्या छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्याने या सभेकडे विशेष लक्ष
- तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मनमाड मतदारसंघाचा आदित्य ठाकरे करणार दौरा
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा नाशिक जिल्हा दौरा महत्त्वाचा
- 08:41 AM • 21 Aug 2024
Pune News : वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण
वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले असून आजपासून हे येरवडा स्थानक सुरू होणार आहे. इतर मेट्रो स्थानकांप्रमाणेच आता येरवड्यातून प्रवाशांना मेट्रोमध्ये बसता येणार आहे. प्रवासी संख्या वाढवणे आणि पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे यासाठी या स्थानकाच्या प्रवासी सेवेचा उपयोग होणार आहे. येरवडा मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याने वनाज ते रामवाडीपर्यंतची मेट्रोलाईन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT