लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : ''उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतो, पण...'', ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Breaking News maharashtra band udhhav thackeray
उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज शुक्रवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात येणार आहे. संपूर्ण शहरभरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल. शहरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट तर दुकान बंद आहेत. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार निषेधार्थ आज कोल्हापूर बंद असणार आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेत दाखल झालेत. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना भेटीसाठी शरद पवारांनी आज मोदी बागेत बोलावलं आहे. दरम्यान काँग्रेसच्या वतीनं उद्या जालना बंदची हाक देण्यात आली आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

    ADVERTISEMENT

    • 07:15 PM • 23 Aug 2024

      ''उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतो, पण...'', ठाकरे काय म्हणाले?

      ''उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतो असे ठाकरे गटाचे  प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. पण प्रत्येक गावात, शहरात मुख्य चौकात महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीला निषेध करतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

    • 07:15 PM • 23 Aug 2024

      महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना नोटीसा

      बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. 
       

    • 02:34 PM • 23 Aug 2024

      Ajit Pawar : 'काम करूनही आम्हाला फटका बसला', अजित पवार स्पष्टच बोलले!

      “काम करूनही आम्हाला फटका बसला, तुमच्या सारखं आम्हाला मन आहे. कांद्याने आमचा लोकसभेत वांदा केला, देशाचे कृषिमंत्री भेटलेत कांदा, सोयाबीन यांना भाव चांगला ठेवा. विरोधक म्हणतात 6 महिन्यात सरकार जाणार. एकनाथ शिंदेचे सरकार आले तेव्हाही असच म्हटलं होतं. सगळे मला विचारतात गुलाबी रंग आणला, हा रंग महिलांना आवडतो, गुलाबी रंगाचे फेटे एकाच ठिकाणी बघितले का? ही किमया लाडकी बहीण योजनेची आहे” असं अजित पवार म्हणाले.

    • 02:23 PM • 23 Aug 2024

      महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली

      महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्स्यांगडी नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमधून तब्बल 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात तनहुन जिल्ह्यातील आयना पहारा येथे झाला. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. 

       

    • ADVERTISEMENT

    • 12:21 PM • 23 Aug 2024

      Maharashtra News : उद्या महाराष्ट्र बंद! राजकीय कारणासाठी नाही तर... - उद्धव ठाकरे

      'उद्या 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र बंद राहणार आहे. हा बंद राजकीय कारणासाठी नसून विकृतीविरूद्ध संस्कृती याकरिता आहे. सध्या राज्यात अस्वस्थता आहे. आम्ही विकृतीचे विरोधी आहोत. उद्याचा बंद आम्ही नागरिकांच्या वतीने करतोय.  नागरिकांनी मोठ्या संख्येने बंदमध्ये सहभागी व्हावं. अत्यावश्यक सेवा वगळता उद्या सर्व बंद राहील. यंत्रणांनी वेळेवर काम केलं असतं तर बदलापुरात उद्रेक झाला नसता. तसंच, उद्याच्या बंदमध्ये मविआ, मित्रपक्षासह सर्व नागरिक सहभागी होतील. हायकोर्टानं काल राज्य सरकारला थोबडवलं, हे देखील राजकारणानं प्रेरित होतं का?'  अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.


       

    • 10:57 AM • 23 Aug 2024

      मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

      मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा उद्या अमरावतीत दाखल होणार. त्यावेळी राज ठाकरे अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. अमरावती मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लागले आहेत

    • ADVERTISEMENT

    • 10:41 AM • 23 Aug 2024

      महायुती सरकारला मोठा धक्का! 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

      महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना दिलेल्या २२६५ कोटींच्या कर्ज वितरणास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना शासन हमीवर सुमारे २२६५ कोटी रुपयांचे खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन उपलब्ध देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हाच निर्णय वादात सापडला आहे.

    • 09:01 AM • 23 Aug 2024

      Maharashtra News : अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट


      राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. राजू नवघरे हे हिंगोली जिल्हयातील वसमतचे आमदार आहेत. दोघांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली आहे. अजित पवार गटाच्या आमदाराने अचानक रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

    • 09:00 AM • 23 Aug 2024

      Crime : बदलापूरनंतर आता नागपूरातही आठ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, 50 वर्षीय शेजाऱ्याला अटक

      बदलापूरनंतर आता नागपूरात शेजारी राहणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीने आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

      याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आठ वर्षीय बालिकेच्या घरी कोणी नसताना ती शेजारी राहणारा आरोपी आदेश वासनिक याच्या घरी गेली. यानंतर आरोपीने मुलीच्या अंगावरील काही कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने रडत रडत घरी जाऊन आईला आपला संपूर्ण प्रकार सांगितला.

      जुनी कामठी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 74, 75, 351 (E) सह POCSO च्या कलम 8 आणि 10 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी आदेश वासनिकला अटक केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT