‘केस पांढरे होऊन उपयोग काय..?’, जरांगे-पाटलांचा भुजबळांवर पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil criticizes minister Chhagan Bhujbal over Maratha and OBC reservation
Manoj Jarange Patil criticizes minister Chhagan Bhujbal over Maratha and OBC reservation
social share
google news

Manoj Jarange Patil: राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली. त्यातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन अनेक सवालही उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वादही आता पेटला. त्यामुळे साहजिकच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) विरुद्ध जरांगे पाटील असा वाद टिपेला गेला आहे. सध्या जरांगे पाटील महाराष्ट्राचा दौरा करत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी एल्गार (OBC Elgar Sabha) मेळावाही भुजबळ गाजवत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे.

ADVERTISEMENT

भुजबळ काहीही बोलतात

हिंगोलीच्या मेळाव्यातून आणि त्याआधीही छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकेरी बोलत टीका केली होती. त्यावरुन जरांगे पाटील यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. आजही मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, वय झाल्यामुळे भुजबळ काहीही बोलतात, आणि त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय जर दुसऱ्या समाजाबद्दल आकस असेल असा सवाल त्यांनी केला.

हे ही  वाचा >> ‘…फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका’, मराठा आरक्षणावरून भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

पांढऱ्या केसांचा उपयोग काय?

छगन भुजबळ यांनी हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेतून जरांगे पाटलांवर त्यांनी जोरदार टीका केली होती. मला म्हातारा म्हणतोय, पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केली असल्याचे त्यांनी त्यांना ठणकावून सांगितले होते. त्यावर जरांगे पाटील यांनी म्हटले की, तुमच्या पांढऱ्या केसांचा आता काहीच उपयोग नसल्याचे सांगत त्यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

हे वाचलं का?

भुजबळांची आंदोलनं अशीच…

छगन भुजबळांच्या केसांवरुन जरांगे पाटील यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, याबाबत छगन भुजबळ यांना काहीच माहित नाही, मग कशासाठी केस पांढरे केले असा प्रतिसवालही जरांगे पाटील यांनी केला आहे. छगन भुजबळांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुनदेखील मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर देताना म्हटले की, छगन भुजबळांची आंदोलनं ही अशीच असतात वाटतं, ते बीडमध्ये अश्रू पुसायला गेले होते मग अंतरवाली सराटीमध्ये का आले नाहीत असा सवालही त्यांनी केला आहे.

दंगल सभा

हिंगोलीतील सभेवरून त्यांनी छगन भुजबळांसह त्यांनी राजकीय नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या सभेसाठी अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या सभेला दंगल सभा असं नाव द्यायला पाहिजे होतं असं म्हणत त्यांनी एल्गार सभेवरही जोरदार टीका केली. भुजबळांनीही त्यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आता हा वाद विकोपाला जात वैयक्तिक पातळीवर आल्याने एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही  वाचा >> Rushikesh Bedre : “पवार साहेब, कट नेमका कुणी रचला?” राणेंनी दाखवला फोटो, NCP ने घेरले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT