लाइव्ह

Maharashtra Live Update : महेश गायकवाडांचं समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Manoj Jarange Live updates, maharashtra assembly budget session 2024 live : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. दुसरीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू होत आहे. या महत्त्वाच्या घटनांचे अपडेटसह आणि इतर बातम्या वाचा मुंबई तक लाईव्ह अपडेट्स मध्ये....

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

  • 06:17 PM • 26 Feb 2024

    'आम्ही मराठा आरक्षण दिलं आहे' - प्रवीण दरेकर

    'राज्य सरकारची भूमिका ही सगळ्यांना न्याय देण्याची आहे. आम्ही मराठा आरक्षण दिलंय. मनोज जरांगे पाटील जे बोलत आहे ते वक्तव्य बेताल आहे. त्यांना आरामाची गरज आहे, दोन दिवस नाही तर जास्त दिवस त्यांना आरामाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेलं विधान हे चुकीचं आहे. मला असं वाटतंय की त्यांना टार्गेट करणं आता तरी बंद करावं. राज्यात अराजक कुणीही माजवता कामा नये,' असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

     

  • 06:15 PM • 26 Feb 2024

    महेश गायकवाडांचं समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

    कल्याणच्या दुर्गाडी चौकात महेश गायकवाड यांचं समर्थक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्या आलं. यावेळेस ‘टायगर इज बॅक’ अशा आशयाचे बॅनर हातात घेत समर्थकांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाके वाजवत स्वागत केलं. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात महेश गायकवाड वर गोळीबार केला होता. यानंतर महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर 24 दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • 04:17 PM • 26 Feb 2024

    उद्धव ठाकरेंना शिंदेंनी विदर्भात दिला मोठा झटका! महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

    उद्धव ठाकरेंना पूर्व विदर्भात मोठा झटका बसला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे या एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

    काही दिवसांपूर्वी शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला. त्यांनी पक्षातील काही महिला नेत्यांवर ठपका ठेवत पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिल्पा बोडखे यांनी शिवनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

    Shilpa bodakhe joined eknath shinde's shiv sena
    ठाकरे गटाच्या नेत्या शिल्पा बोडखे यांचे शिवसेनेत स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
  • 04:10 PM • 26 Feb 2024

    आमरण उपोषण स्थगित! मनोज जरांगेंची मोठी घोषणा

    मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते. परंतु, अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा, तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी दोन पावले मागे घेत मराठा आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले.  

  • ADVERTISEMENT

  • 04:10 PM • 26 Feb 2024

    शरदचंद्र पवार गटाकडून नव्या कार्यालयाची मागणी!

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून नव्या कार्यालयाची मागणी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे. विधी मंडळात पक्ष कार्यालय देण्यात यावं, यासाठी अध्यक्षांना पत्राद्वारे मागणी करण्यात आलीये. सध्या दोन्ही गटातील आमदार एकाच कार्यालयाचा वापर करत आहेत.

  • 12:58 PM • 26 Feb 2024

    माझा आणि फडणवीसांचा संबंध काय? -बारसकरांचा जरांगेंना सवाल

    अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंना उत्तर दिले. "ते म्हणालेत की, माझ्याकडून आठमुठेपणा झाला. काल कोट्यावधींची सभा असणारा समाज दोनशे लोकांवर आला. घेतलेला निर्णय परत घेण्याची नामुष्की आली. एकही नेता टीका करत नव्हता. कालपासून प्रचंड टीका व्हायला लागली. प्रसाद लाड तुम्हाला नटसम्राट म्हणाले. नटरंग चित्रपट बघितला असेल. म्हणून आम्ही बोलतोय. मला का घाबरत आहात. बारसकर हा फडणवीसांचा माणूस आहे. काय संबंध आहे माझा आणि फडणवीसांचा?" 

    "एक फोटो दाखवला. हा फोटो ज्यांनी समाजमाध्यमांवर टाकला त्यांचे आभार मानतो. या फोटोत जे दिसतात, त्यांना विचारा की, फडणवीसांची भेट का घेतली होती. आम्ही २०१७ ला मराठा आरक्षण मागण्यासाटी गेलो होतो. अनेक वेळा आम्ही भेट घेतली होती. मारूतीच्या मंदिरात बसून आरक्षण मिळत नाही. काम करावं लागतं. न्यायालयात जावं लागतं. त्यांना मी दोष देत नाही. भावना आणि बुद्धी याचा मेळ त्याला बसत नाही. कारण ह्या बाबाने इतकं नाटक केलं", असे बारसकर मुंबईत बोलताना म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 12:28 PM • 26 Feb 2024

    'जरांगेंच्या तोंडातून आता तुतारीता आवाज येतोय असं वाटतंय'; नितेश राणेंचा हल्लाबोल!

    'मराठा समाजाशी आमची लढाई नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जरांगे कुणाच्या जीवावर शिव्या-शाप देत आहेत? जरांगेंच्या तोंडातून आता तुतारीता आवाज येत आहे असं वाटतंय. जरांगे फक्त फडणवीसांवरच का टीका करतात? जरांगेंनी ठाकरेंची भाषणं कॉपी-पेस्ट केली आहेत का? जरांगेंचे समर्थक आम्हाला फोन करत आहेत, फोन करणाऱ्यांचे पत्ते आमच्याकडे आहेत. मराठा आरक्षणाची केस कोर्टात गेल्यास फडणवीसच उभे राहतीस तेच मोठे वकील देतील. मनोज जरांगेंची नार्को टेस्ट केली पाहिजे.' असं म्हणत नितेश राणेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला.   

  • 10:22 AM • 26 Feb 2024

    'मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही', जरांगेंचा सरकारला इशारा!

    'हट्टापायी समाज अडचणीत येता कामा नये. किल्ला जिंकून दाखवणारच, मला बोलावलं पण फडणवीसांनी घराचे दरवाजे बंद केले. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड अशा 3 जिल्ह्यांमध्ये एसटी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील एसटी सेवा पूर्णपणे बंद. आम्ही शांततेत आंदोलन केलं, मग गुन्हे दाखल का केले? उद्यापासून अंतरवालीत पुन्हा साखळी उपोषण सुरू राहणार. शिंदे-फडणवीसांनी आणखी नाराजी ओढवून घेऊ नये. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तत्काळ करा. '

  • 09:46 AM • 26 Feb 2024

    सत्ता कशी येते बघतो, दम लागतो -मनोज जरांगे

    "तुझ्यात दम असेल, तर सागर बंगल्यावर ये. तुला जातीवर आव्हान केलं होतं. तू बामणाचा असला, तरी मी खानदानी मराठा आहे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला. बघतो सत्ता कशी येते, दम लागतो. एक तासात सांगंतो, तो रात्रीच करणार होता. जनता काम केल्यावर आदर करते", असे जरांगे पाटील फडणवीसांवर टीका करताना म्हणाले.

  • 09:12 AM • 26 Feb 2024

    फडणवीसांना सवाल, जरांगेंनी काय दिला इशारा?

    भांबेरी गावात बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "संचारबंदी का लावली? कारण काय? अंबड तालुक्यात संचारबंदी लावली म्हणजे आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं नाहीये. फडणवीसांनी रात्री बंदुकीचा फोटो टाकला. दम होता तर थांबायचं, आम्हाला येऊ द्यायचं नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. थोडं पुढे गेल्यावर होणार होता. म्हणून सकाळी निघणं गरजेचं होतं. कुणाकडे काहीच साहित्य नव्हतं. देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायेत सगळं. एक-दोन तासात निर्णय घेऊ", असं मनोज जरांगे म्हणाले.

  • 09:06 AM • 26 Feb 2024

    अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्यानंतर जरांगे काय म्हणाले?

    भांबेरी गावातून मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी गावात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी उपस्थितांना आपापल्या घरी जाण्याचं आवाहन केलं. जरांगे पाटील म्हणाले, "मी एकटा बसेन. मी पोलिसांना शब्द दिला आहे की, सगळे शांततेत घरी जातील. जे भेटायला येतील, त्यांनाही समजून सांगा", अशी सूचना जरांगेंनी केली.

follow whatsapp

ADVERTISEMENT