Sanjay Raut : …तेव्हा ईडीची शाई संपते का? राऊतांचा सरकारवर घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

mp Sanjay Raut criticizes central and state government over ednotice
mp Sanjay Raut criticizes central and state government over ednotice
social share
google news

Sanjay Raut : कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करूनसु्द्धा भाजपच्या (BJP Leader) एकाही नेत्याला नोटीस (ED Notice) पाठवली जात नाही. तर विरोधी पक्षातील नेत्यांना मात्र नोटीस पाठवून त्रास देण्याचं काम भाजपकडून केले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी ईडीच्या नोटीसवरून राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी कोट्यवधीचे घोटाळे करूनही त्यांना नोटीस पाठवताना ईडीचे शाई संपते की, प्रिंटर बंद पडतो असा सवाल उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या नेत्यांची संपत्ती जप्त

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतून फुटून सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा केल्याचे पंतप्रधान सांगतात. तरीही त्यांना नोटीस पाठवली जात नाही. यावेळी त्यांनी प्रप्फुल्ल पटेल यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांची 400 कोटीची संपत्ती जप्त केल्याचे सांगत अशा लोकांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांचा सगळा घोटाळाच त्यांनी चव्हाट्यावर मांडला आहे.

हे ही वाचा >>  Chhagan Bhujbal नी शिंदे सरकारविरोधात थोपटले दंड! ओबीसींना हाक, केली मोठी घोषणा

सूडाने कारवाई

त्यांच्याबरोबरच मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यावरही ईडीने कारवाई केली मात्र ते त्यांना नोटीस किंवा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकार विरोधी पक्षातील नेत्यांवर सूडाने कारवाई करत असल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

हे वाचलं का?

भाजपसमोर झुकणार नाही

खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून केंद्रावर टीका करताना त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटातील रोहित पवारांना राजकीय सूडबुद्धीनं त्रास दिला जातो आहे. कारण आमच्यासारखी माणसं त्यांच्यासमोर झुकणार नसल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 सरकार आमचंही येईल

सरकार आमचंही येईल, त्यावेळी हिशोब तुम्हालाही द्यावं लागेल असा थेट इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या काही कारवाया करायच्या आहेत, त्या करून टाका, काय फासावर लटकवायचे आहे ते एकदाच लटकावा, मात्र हा देशाचा लढा आहे, त्यामुळे आम्ही मागे हटणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>भुजबळांचा विरोध! मनोज जरांगेंचाही आक्रमक पवित्रा, अभ्यासकांना केलं आवाहन

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT