आजचा मुद्दा: 'उद्धव ठाकरेंकडून टोलवाटोलवी सुरू आहे का?', युतीबाबत मनसेला वाटतोय संशय!
मनसे शिवसेना UBT च्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसेकडून मात्र असा दावा केला जात आहे की, युतीसाठी उद्धव ठाकरे केवळ टोलवाटोलवी केली जात आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल.' असं विधान करत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत मोठे संकेत दिले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना UBT आणि मनसेच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात नव्याने जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, असं असताना मनसेकडून मात्र आता सावध पावलं टाकली जात आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत टोलवाटोलवी चालली असा दावाच मनसेकडून केला जात आहे. मुंबई Tak च्या आजचा मुद्दा या विशेष शोमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे विधान केलं. या कार्यक्रमात शिवसेना (UBT) नेते दिपेश म्हात्रे यांनीही सहभागी होऊन पक्षाची बाजू यावेळी मांडली.
मनसेला शिवसेना UBT बद्दल का वाटतोय संशय?
कार्यक्रमात बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, 'जर 2017 सारखा अनुभव पुन्हा आला तर याची गॅरंटी कोण घेणार?'
ज्यावर उत्तर देताना दिपेश म्हात्रे म्हणाले की, 'आम्हाला भाजपकडून वाईट अनुभव आलेच.. पण तेवढेच शिवसेनेकडून देखील वाईट अनुभव आले आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील. म्हणजे ज्या पद्धतीने खोट्या केसेस अडीच वर्षात माझ्यावर टाकल्या गेल्या. मी तेही विसरायला तयार आहे. जर दोन भाऊ एकत्र यायला तयार असतील तर..'
ज्यावर उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले की, 'पण जर तुम्ही म्हणता की, गॅरंटी कोणतीच नाही. तर चर्चा होऊच कशी शकते. तुमचं माझं सोडून द्या.. पण दोन भावांना तर कॉन्फिडन्स बिल्डिंग करावं लागेल ना. त्याशिवाय युती होणार नाही.'