शिंदे सरकार 15 दिवसांत कोसळणार? राऊतांच्या दाव्यावर अजितदादांची सावध बॅटिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP Leader Ajit Pawar reaction on sanjay raut statement on shinde government
NCP Leader Ajit Pawar reaction on sanjay raut statement on shinde government
social share
google news

बारामती : माझी अलिकडे संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट नागपूरला जाताना झाली होती. त्यानंतर त्यांचे आणि माझे समक्ष किंवा फोनवर बोलणं झालेलं नाही. संजय राऊत यांना कोणती माहिती मिळाली हे माहित नाही. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक मान्यवर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत असतात. ते त्यांच्या माहितीच्या आधारे, अनुभवाच्या आधारे बोलत असतात. त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती माझ्याकडे नाही, मी त्यावर काय सांगणार, असं म्हणतं संजय राऊत यांच्या शिंदे सरकार 15 दिवसांत कोसळणार या दाव्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सावध भूमिका घेतली. ते बारामतीमध्ये (Baramati)बोलत होते. (NCP Leader Ajit Pawar reaction on sanjay raut statement on shinde government)

ADVERTISEMENT

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना (UBT) गटाची आज (रविवारी) पाचोऱ्यामध्ये सभा होणार आहे. यावेळी सभेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी 15 दिवसांत शिंदे सरकार कोसळणार असं म्हटलं होतं. एकनाथ खडसे यांनी असं म्हटलं की, अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात. खडसे यांच्या या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “बघा, प्रत्येकजण आपापली गणितं मांडत आहे. आम्ही निकालाची वाट पाहतोय. पण, सध्या जे मुख्यमंत्री आणि त्याचं 40 लोकांचं राज्य आहे. ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्याशिवाय राहणार नाही.”

Sanjay Raut : “मृत्युलेख लिहिला गेलाय, शिंदे सरकार 15 दिवसांत कोसळणार”

“मी मागे एकदा सांगितलं होतं की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल. पण, न्यायालयाचा निकालच उशीरा लागतोय, पण हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्युलेख लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही आणि कुणी करायची हे ठरलं आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. पुष्पचक्र अर्पण करा”, असं भाकित संजय राऊत यांनी केलं.

हे वाचलं का?

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्रासह देशभरात 50 खोके, एकदम ओके हे सगळ्यांना माहिती झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात फार वेळ वाया घालवायला नको. लोकांची कामं महत्त्वाची आहेत. देशात आणि राज्यात लोकशाही संपायला लागली आहे, बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढत आहे. सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. यावर सत्ताधाऱ्यांपैकी कोणीही बोलत नाही. ते केवळ राजकारण करत आहेत. आम्हाला या राजकारणात रस नाही. आम्ही लोकांची सेवा करायला राजकारणात आलो आहे. ते करत राहू, असं म्हणतं आदित्य ठाकरे यांनी राऊतांच्या दाव्यावर मत व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT