Pune Murder: भर रस्त्यात 5 गोळ्या झाडल्या, माजी नगरसेवकाच्या हत्येनंतर पवारांचा नेता संतापला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vanraj Andekar Murder Case
Vanraj Andekar Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

point

पुण्यातील हत्येच्या घटनेबाबत जयंत पाटील यांचं मोठं ट्वीट

point

जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली सडकून टीका

Vanraj Andekar Murder Case : विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असतानाच पुण्यातील हत्येच्या घटनेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची अज्ञातांनी भर चौकात गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर कोयत्यानेही वार केले. ही धक्कादायक घटना नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. (
Even as the Assembly elections are about to be held, the murder incident in Pune has created excitement in the political circles. Former NCP corporator Vanraj Andekar was shot dead by unknown persons. The assailants also stabbed Vanraj with a coyote. This shocking incident happened in front of Doke Talami in Nana Peth around 9.30 pm on Sunday)

गोळीबाराचा थरार रंगल्यानंतर शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वनराज आंदेकरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने आंदेकरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन संशयीत आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. वनराज यांच्या हत्येची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून याप्रकरणी आणखी काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा >> Sharad Pawar : "शिवरायांची तुलना कुणाशी...", शरद पवारांनी PM मोदींना सुनावलं

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.  "पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?', असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 पुणे शहरात भर चौकात वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी तीन संशयीत आरोपींना अटक केल्याचं समजते. वनराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT