पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल, ओमराजेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
Pawanraje Nimbalkar murder case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर मुंबई न्यायालयात निकाल लागण्याची शक्यता; आरोपींना हजर राहण्याचे आदेश.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल
ओमराजेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
Pawanraje Nimbalkar murder case : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 20 वर्षांनंतर आज मुंबईतील न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील अंतिम निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. 2006 मध्ये कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील पुराव्यांचे संकलन आणि साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे.
हेही वाचा : Maharashtra Monsoon : उष्णतेची लाट कुठल्या भागांमध्ये धडकणार? पाऊस कधी येणार?
दरम्यान, आज (दि.16) निकाल लागणार असताना ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत भावना व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात..
ओमराजे निंबाळकर यांची पोस्ट जशीच्या तशी
20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची.... माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा.









