Rohit Pawar अजित पवारांवर बरसले! म्हणाले,’विकासासाठी गेलात ना, मग…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rohit pawar criticize ajit pawar group sharad pawar jalgaun rally maharashtra politcs
rohit pawar criticize ajit pawar group sharad pawar jalgaun rally maharashtra politcs
social share
google news

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने विकासासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा दावा केला होता. या दाव्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित गटाला घेरतं त्यांना आव्हान दिले आहे. जर विकासासाठी सत्तेत गेला असाल तर जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करा आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा असे आव्हान रोहित पवारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) दिले आहे. (rohit pawar criticize ajit pawar group sharad pawar jalgaun rally)

ADVERTISEMENT

शरद पवार गटाची जळगावात स्वाभिमान सभा सूरू आहे. या सभेत रोहित पवार बोलत होते. राजकारणात जे झाले आहे ते कोणालाही पटलेलं नाही. जेव्हा पक्षाचा विश्वास स्वत:च्या कार्यकर्त्या,पदाधिकाऱ्यांकडून उडतो, तेव्हा दुसऱ्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न होतो, भाजपची ही आजची परिस्थिती असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

भाजपने राष्ट्रवादीला फोडलं, नेत्यांना फोडलं, पण कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच असल्याचे विधान करून रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. भाजपाने कितीही प्रयत्न केला, पैशाचा वापर केला,शक्तीचा वापर केला, दबावाचा वापर केला. तरी महाराष्ट्राची जनता दिल्लीसमोर झुकणार नाही, असे देखील रोहित पवारांनी यावेळी ठणकावून सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘… तर मराठ्यांना आरक्षण देणं शक्य’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितला कायदा

भाजपला वाटतं असेल काही नेत्यांना फोडले म्हणजे राष्ट्रवादी संपली, पवार साहेब संपले, पवार साहेब व्यक्ती नाही तर विचार आहेत, तो विचार तुम्ही लोकांच्या मनातून कधीही काढू शकत नाही,असे देखील रोहित पवार यांनी सांगत भाजपावर हल्लाबोल केला.

शरद पवार या वयात लढत आहेत, अनेकजण त्यांच्या वयाबद्दल बोलतात. वयात काय ठेवलंय,पवार साहेब 83 वर्षाचे आहेत. पण ते 83 वयाचे असले तरी ते युवा नेते आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत काम करत असतात, असे सांगत रोहित पवारांनी अजित पवारांचा समाचार घेतला.

ADVERTISEMENT

आपल्यातलेच काही जण सत्तेत जाऊन बसले, त्यांना विचारलं जात, तुम्ही पलिकडे का गेलात? कदाचित व्यक्तिगत कारण, स्वार्थी राजकारण असू शकतं. तिकडे जाऊन म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो. मग विकासासाठी गेला असाल तर राज्यात 22 हून जास्त जिल्हयात दुष्काळ आहे. पुढच्या 4-5 दिवसात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला मदत करा, असे थेट आव्हानच रोहित पवार यांनी अजित पवार गटाला दिले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Republic of Bharat : मोदी सरकार बदलणार देशाचे नाव? दिले स्पष्ट संकेत

गॅसचे दर वाढले तेव्हा तुम्ही भाजपचा विरोध केला होता. जेव्हा जेव्हा सर्वसामान्यावर अन्याय झाला, तेव्हा भाजपविरोधात बोललात, आता तुम्ही सहजपणे भाजपसोबत जाताय. भाजपला हेच पाहिजे आहे.पण शरद पवारांनी सांगितलं आहे, काही झालं तरी मुळावर वार करायचा आणि भाजप राज्यातून संपवण्याचे प्रयत्न करायचे. यासाठी तुमच्या सर्वाची साथ हवी आहे, अशी साद देखील रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना घातली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT