संदीप राऊतांच्या ED नोटीसीवर राऊत कडाडले, ‘फडणवीसांच राज्य आहे की अफजलखान…’

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

sanjay raut criticize devendra fadnavis sandeep raut ed notice khichadi scam bmc maharashtra politics
sanjay raut criticize devendra fadnavis sandeep raut ed notice khichadi scam bmc maharashtra politics
social share
google news

Sanjay Raut Reaction on Sandeep Raut ed Notice : खिचडी घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. या नोटीसीवर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. फक्त खिचडी बनवण्यासाठी त्यांच्या हॉटेलचा वापर केला होता. या विषयी ईडी नोटीस पाठवते, किती हास्यास्पद आणि मुर्खपणा आहे ? असा सवाल करत, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच (Devendra Fadnavis) राज्य आहे की, अफझलखान, शाहिस्तेखानच राज्य आहे की निजामशाही आली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. (sanjay raut criticize devendra fadnavis sandeep raut ed notice khichadi scam bmc maharashtra politics)

संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटप, इंडिया आघाडी यासह इतर अनेक मुद्यावर भाष्य केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच राज्य आहे की, अफझलखान, शाहिस्तेखानच राज्य आहे, की निजामशाही आली आहे, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. तसेच तुम्हाला काय कराचंय ते करा, आम्ही गुडघे टेकणारे नाही. दोन पाच लाखाच्या नोटीसी पाठवता तुम्ही काय चिंचोके खाता का? असा टोला देखील राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

हे ही वाचा : Crime : अकोला हादरलं! आधी प्रेयसीचा गळा चिरला मग स्वत:ला संपवलं

तुमची बायका पोरं परदेशात लंडनमध्ये राहत आहेत. स्वतःचे विला घेऊन, कुठून आले पैसे? त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का? पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही, आमच्यावर संस्कार आहेत, हे संस्कार बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचे आहेत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहेत. लढाई आमच्याशी आहे तर आमच्याशी लढा. नामर्द आहात तुम्ही, हे जे खेळ चालले आहेत ना ज्या पद्धतीने आमच्या लोकांना बोलवत आहेत जे बेकादेशीरपणे त्यांना देखील आम्ही आरोपीच पिंजऱ्यात उभे करू काय हवं ते करा, असे देखील राऊत म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पत्रकारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या 70 घोटाळ्याच्या आरोपावर प्रश्न केला. 70 हजार कोटीचा घोटाळा बाहेर काढून अजित पवारांना सरकारच्या तुरूंगात टाकलं ना. या मांडीवर अजित पवार, या मांडीवर हसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल पटेल, अशी खिल्ली देखील राऊतांनी यावेळी उडवली. तसेच तुम्ही रामाची पुजा करता ना, तुमचा वध रामच करणार आहे, असे राऊतांनी यावेळी सांगितले.

संदीप राऊतांच्या नोटीसीवर काय म्हणाले?

मला माहिती आहे संदिप राऊत यांना नोटीस आली आहे, त्यांचे हॉटले आहे.त्या हॉटेलमध्ये खिचडी बनवण्यासाठी त्यांच्या हॉटेलचा वापर केला होता आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली होती. या विषयी ईडी नोटीस पाठवते. किती हास्यास्पद आणि मुर्खपणा आहे हा? आमच्या घरातील लोक जातील उभे राहतील ठामपणे तुम्हाला हवं के करा, असे थेट आव्हानच राऊतांनी देऊन टाकले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘…तर आंदोलनाचा मार्ग योग्यच’, जरांगेंच्या पदयात्रेवर CM शिंदे काय म्हणाले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT