Sanjay Raut : “अजित पवार मुख्यमंत्री होणार”, राऊतांनी सांगितली तारीख

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

ajit pawar will become maharashtra chief minister, says sanjay raut.
ajit pawar will become maharashtra chief minister, says sanjay raut.
social share
google news

Sanjay Raut Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. अपात्रता प्रकरणाच्या निकालात एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांचं सदस्यत्व जाईल आणि सरकार कोसळेल, असे दावे ठाकरे गटाकडून केले जात आहे. त्यातच आता राऊतांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असे विधान केले आहे. (Sanjay Raut Reaction on Ajit pawar)

ADVERTISEMENT

मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “आम्हाला देखील वाटते की, अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे.”

हेही वाचा >> Exit Poll 2023: निकालाआधीच सत्तेचा अंदाज! कसे केले जातात एक्झिट पोल?

मुख्यमंत्रिपद कधी रिकामे होणार? राऊत म्हणाले…

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घ्या, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिल्या आहेत. हा निकाल आल्यानंतर शिंदे सरकार जाणार. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामे होईल. त्या जागेवर अजित पवार बसले, तर आम्हाला आनंद होईल”, असे मत राऊतांनी मांडले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ‘अरे कशा करता?’, अजित पवार संजय राऊत, रामदास कदमांवर कडाडले

“…असं करून दिघेंचा अपमान”, राऊत नेमकं काय बोलले?

दत्ता दळवींना अटक झाली. या कारवाईवर बोलताना राऊत म्हणाले, “सुडाच्या भावनेतून ही कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात दोन कायदे आहेत. गद्दारांसाठी वेगळा कायदा असेल, तर तसं जाहीर करा, राज्यपालांना आम्ही विचारतोय. ज्या शब्दावरून दळवींना अटक केली, तो धर्मवीर चित्रपटात आहे. आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द सेन्सॉरने कापला का? दळवींना अटक करून तुम्ही आनंद दिघे यांचाही अपमान करत आहात”, अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT