MLA Disqualification: शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंच्या वकिलांनी घेरलं… वाचा सुनावणी जशीच्या तशी

योगेश पांडे

ADVERTISEMENT

shiv sena mla disqualification shinde group mla surrounded by thackeray lawyers read the hearing as it is
shiv sena mla disqualification shinde group mla surrounded by thackeray lawyers read the hearing as it is
social share
google news

Shiv Sena MLA Disqualification: मुंबई: शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) अपात्रता प्रकरणी सलग आज (8 डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी नागपूरच्या विधिमंडळात सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या सुनावणीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची उलटतपासणी घेण्यात आली. वाचा आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं. (shiv sena mla disqualification fierce controversy over whip sunil prabhu mahesh jethmalani clash read hearing as it is)

वाचा आजची सुनावणी जशीच्या तशी

प्रश्न- हा राजन प्रभाकर साळवी आमदार यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष पदाचे उमेदवार करण्यात यावे. विधानसभा अध्यक्ष म्हणून उमेदवार म्हणून उभे करण्यात आले होता हे चूक की बरोबर?

उत्तर- दिलीप लांडे- शिवसेने तर्फे राहुल नार्वेकर यांना उभे केले होते.

प्रश्न- राजन साळवे शिवसेना हे 2 जुलै 2022 रोजी आमदार होते का?

उत्तर- दिलीप लांडे – मी नवीन असल्यामुळे सर्व सदस्यांना ओळखत नाही

प्रश्न- आपण विधानसभेत नवीन असल्यामुळे आपल्याला शिवसेनेच्या सर्वच विधानसभा सदस्यांच्या नावे माहीत नव्हती हे बरोबर की चूक?

उत्तर- बरोबर

ठाकरे गट वकील प्रश्न- हे खरे आहे काय की तुम्ही राहुल नार्वेकर , भाजप याना स्पीकर पदावर नियुक्त करण्यासाठी मत दिलेलं होत?

उत्तर- शिंदे गट वकील
हा प्रिव्हिलेजचा प्रश्न आहे. मतदान गुप्त असल्याने याचे असे उत्तर देता येणार नाही.

प्रश्न – अध्यक्ष पदाच्या निवडणूकमध्ये श्री. राहुल नार्वेकर यांना 164 मतांनी निवडणूक मध्ये दिनांक 3 जुलै 2022 मध्ये निवडण्यात आल त्यामुळे असं म्हणणं योग्य राहील का श्री नार्वेकर यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या पक्षादेश नुसार मतदान केलेलं आहे का ?

राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी पक्षाने काही व्हीप काढला होता का?

उत्तर-दिलीप लांडे – आठवत नाही

प्रश्न- हे खरे आहे का की, शिवसेनेचे विधानसभा सदस्य राजन साळवी यांच्या विरोधात राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करण्यात यावा असा शिवसेनेने कोणत्याही पद्धतीने पक्षादेश काढला नव्हता हे बरोबर की चूक?

उत्तर- आठवत नाही हे मी पहिलेच सांगितलं आहे..

प्रश्न- तुम्हाला इमेल आयडी आठवतो का rajgadbank9@gmail.com हा तुमचा इमेल आयडी आहे का?

उत्तर- होय माझा इमेल आयडी आहे. परंतु माझ्या पतपेढीचा( Credit Society) आहे..

प्रश्न- तुम्हाला ईमेल 22 जुलै 2022 ला 2.42 वाजता इमेल आला त्यात व्हीप होते, सुनील प्रभू यांनी पाठवलेले व्हीप या तुमच्या ईमेल वर मिळालेत?

उत्तर- मी मुंबईला नव्हतो त्यामुळे मला माहिती नाही. माझ्या लहान भावाने दिलेल्या माहितीप्रमाणे विजय जोशी या नावाच्या कोणीतरी पाठवला होता..

प्रश्न- 3 जुलै 2022 रोजीच्या अध्यक्ष निवडणुकीत तुम्ही पक्ष आदेश पाळला नाही त्यामुळे तुम्ही आमदार अपात्रतेसाठी पात्र ठरता हे चूक की बरोबर?

उत्तर- मला सुनील प्रभू यांनी कुठलाही पक्षआदेश पाठविलेला नव्हता

प्रश्न- 4 जुलै 2022 रोजीच्या भरत गोगावले यांच्या मार्फत जारी केलेला कथित पक्षआदेश तुम्हाला कसा मिळाला?

उत्तर-माझ्या हातात दिला

प्रश्न- हा पक्षआदेश आपल्या हातात केव्हा ठेवण्यात आला, वेळ काय होती ?

उत्तर-मला वेळ आठवत नाही.

तारीख आठवण आहे. 4 जुलै

प्रश्न- हा कथित पक्षआदेश आपल्या हातात दिला गेल्यानंतर आपण त्याची काही लेखी पोचपावती दिली का?

उत्तर- आठवत नाही

प्रश्न- चार जुलै 2022 रोजी विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी श्री भरत गोगावले यांनी कथितरित्या कोणत्याही सदस्यांना असा पक्षआदेश जारी केलेला नव्हता असं मी आपल्याला सांगू इच्छितो हे चूक आहे की बरोबर?

उत्तर- मला दिला आहे हे मी कबूल केले आहे.

प्रश्न- 4 जुलै 2022 रोजीच्या विश्वासदर्शक ठरावावर तुम्ही एकनाथ शिंदे यांना मतदान केले होत का?

उत्तर- मतदान गुप्त असत त्यामुळे या प्रश्नाला आक्षेप आहे.

प्रश्न- 4 जुलै 2022 रोजी विश्वास दर्शक ठरावावर तुम्ही भाजपचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले हे चूक की बरोबर?

उत्तर-बरोबर

प्रश्न- आपण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान करून सुनील प्रभू यांनी दिलेल्या व्हीप चे उल्लंघन केले त्यामुळे आपण अपात्र ठरता असे आपल्याला वाटत नाही का?

उत्तर- सुनील प्रभू यांनी कोणताही पक्षाने दिला नव्हता किंवा मला मिळालेला नव्हता

प्रश्न- 20, 21 जून 2022 रोजी आपण एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होता काय?

उत्तर- मी गेल्या 25 वर्षापासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहे.

प्रश्न- तुम्ही 20, 21 जून रोजी सुद्धा शिंदे यांच्या संपर्कात होता हे खरे आहे काय?

उत्तर- मी 20 तारखेला शिंदे यांना भेटलो होतो.

प्रश्न- एकनाथ शिंदे 20 आणि 21 जून 2022 रोजी कुठे होते हे तुम्हाला माहिती होते का?

उत्तर- मी 20 तारखेला मतदान होत त्यावेळी शिंदे यांना भेटलो होतो परंतु 21 तारखेला भेटलेला नव्हतो.

प्रश्न- हे खरे आहे काय, 21 जून 2022 नंतर तुमचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क झाला नाही. 24 जून 2022 पर्यंत. हे म्हणणं योग्य राहील का?

उत्तर- बरोबर आहे

प्रश्न- तुम्ही 20 ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही मुंबईत होते का?

उत्तर- आठवत नाही , then Lande Added 20 ,21 आणि 22 तारखेला मी मुंबईत होतो

प्रश्न- 22 जून ते 30 जून 2022 आपण महाराष्ट्र बाहेर प्रवास केला आहे का?

उत्तर- होय

प्रश्न- महाराष्ट्र बाहेर कुठे आणि केव्हा गेले होते ते आपण सांगू शकाल का?

उत्तर- ही माझी खासगी माहिती आहे, ती मी सांगू शकत नाही, मी कुठेही फिरू शकतो.

प्रश्न- आपण सुरत किंवा गुवाहाटी गेले होते का, 20 ते 30 जून दरम्यान? प्रवास केला होता का?

उत्तर- मी यापूर्वी सांगितलं की ही माझी खाजगी माहिती आहे . मी कुठे फिरायचं हा माझा अधिकार आहे

प्रश्न- 21 आणि 22 जून रोजी तुम्ही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना मुलाखती दिल्या की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि तुम्ही एकनाथ शिंदे यांना समर्थन देत नाहीत? हे खरे आहे का?

उत्तर- आठवत नाही

प्रश्न- सुरत आणि गुवाहाटी किंवा महाराष्ट्र बाहेरील वास्तव्याचे हॉटेलचे भाडे भारतीय जनता पक्षाने चुकते केले होते हे बरोबर की चूक?

उत्तर- मी स्वतः गेलो होतो मी कुठे राहिलो होतो कुठे गेलो होतो याची माहिती मी कोणाला देऊ शकत नाही..

प्रश्न- 22 ते 30 जून दरम्यान तुमचा महाराष्ट्र बाहेरचा प्रवास चार्टर्ड विमानाने झाला होता का?

उत्तर- ही माझ्या खाजगी जीवनाची माहिती आहे . मी बैलगाडीतून गेलो की रिक्षा चालवत गेलो ते मी सांगू शकत नाही

प्रश्न- या कागदावर स्वाक्षरी तुम्ही 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत केली का?

उत्तर- बरोबर

सदर डॉक्युमेंटवर हस्ताक्षराने वरच्या बाजूस काहीतरी लिहिलेले आहे. माझी स्वाक्षरी झाल्यानंतर “पक्षादेश क्रमांक 2/2022” हे लिहिलेले आहे, असे मला वाटते..

प्रश्न- आपल्याला 21 जून 2022 रोजी पत्राद्वारे किंवा पक्षादेशाद्वारे श्री सुनील प्रभू यांच्याद्वारे निर्देश मिळाले म्हणून आपण 21 जून 2022 रोजीच्या बैठकीत उपस्थित राहिले असे मी आपल्याला सांगू इच्छितो हे बरोबर आहे की चूक?

उत्तर- मला श्री गुलाबराव पाटील नावाच्या व्यक्तीने फोन केला होता त्यामुळे मी बैठकीला उपस्थित होतो..

नार्वेकर- आपल्याला आपल्या उत्तरात सुधार करायचा आहे का ?

उत्तर- मला श्री गुलाबराव पाटील नावाच्या व्यक्तीने फोन केला होता त्यामुळे मी बैठकीला उपस्थित होतो हे मी आपल्याला सांगितले आहे..

प्रश्न- 21 जून 2022 रोजीच्या वर्षा बंगला वरील बैठकीच्या आयोजन बाबतचे पत्र/ पक्षआदेश आपल्याला मिळाल्याबाबत आपण काही पोचपावती दिली होती का ?

उत्तर- मी आपल्याला सांगितले की मला 21 तारखेच्या बैठकी संदर्भात श्री गुलाबराव पाटील यांचा फोन आला होता..

प्रश्न- 21 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी तिथे उपस्थित असलेले आमदारांच्या पाठिंब्याने श्री अजय चौधरी यांची श्री एकनाथ शिंदे यांच्या जागी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी नेमणूक केले हे चूक की बरोबर?

उत्तर- आठवत नाही

प्रश्न- 21 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना भेटायला जातील याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या सदस्यांना दिली होती हे चूक की बरोबर?

उत्तर- दिली होती

प्रश्न- एकनाथ शिंदे यांनी 20 जून ते 30 जून 2022 दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणीची एखादी बैठक बोलाउन त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या साथ देण्यासाठी काही निर्णय घेतला होता का?

उत्तर- होय

प्रश्न-20 ते 30 जून 2022 दरम्यान राष्ट्रीय कार्यकारणी बैठक कधी आणि कुठे बोलवण्यात आली होती?

उत्तर- आठवत नाही

प्रश्न- एकनाथ शिंदे यांनी बैठकीची नोटीस राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांना पाठवली होती का?

उत्तर-माहिती नाही

प्रश्न- मी आपल्याला सांगू इच्छितो की 20 ते 30 जून 2022 च्या दरम्यान श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत राष्ट्रीय कार्यकारिणीची कोणतीच बैठक आयोजित करण्यात आलेली नव्हती हे चूक की बरोबर?

उत्तर- लक्षात येत नाही

प्रश्न 20 ते 30 जून 2022 दरम्यान प्रतिनिधी सभा आयोजित केलेली होती का एकनाथ शिंदे यांनी?

उत्तर- आठवत नाही.

प्रश्न- वर्षा बंगल्यावर 22 जून 2022 रोजी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला तुम्ही उपस्थित होतात का?

उत्तर- होय

प्रश्न- अजय चौधरी हे बैठकीचे अध्यक्षस्थानी होते है खरे आहे काय?

उत्तर- असे नव्हते, पक्षाचे सर्वच पदाधिकारी होते. पक्षाच्या नेते मंडळींची ती बैठक होती.

प्रश्न- वर्षा बंगल्यावर दिनांक 22 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये आपण ही स्वाक्षरी केली होती का?

उत्तर- होय, विधिमंडळ सदस्यांच्या सहाय यादीवर घेतलेल्या असतात. आमची यादी बनवली व सह्या घेतल्या परंतु दिनांक 22 जुन 2022 रोजीचे बैठकीची उपस्थिती नंतर पेनाने लिहिलेले आहे ते टाईप केलेले नाही.

मला यातून आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की विधानसभा सदस्यांची यादी वर अगोदर सह्या घेतलेल्या असतात .

उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी सुरू

प्रश्न- अपात्रता याचिका क्रमांक 18, पान क्रमांक 62 मध्ये जे उत्तर दिले त्यामध्ये असे नमूद केले आहे की आपला पक्ष म्हणजे शिवसेना आणि आणि शिवसेनेतील पदाधिकारी आणि तसेच त्याचे सदस्य यांच्यामध्ये मोठी अशी नाराजी होती, कारण शासनामध्ये असलेला भ्रष्टाचार पोलिसांचे पोस्टिंग तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख जे जेलमध्ये होते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक त्यावेळी जेलमध्ये होते त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संबंध होते पक्षांमध्ये या दोन कारणामुळे नाराजी होते असे आपण नमूद केला आहे त्या विधानाशी आपण सहमत आहात का?

उत्तर- मी या संदर्भात माझं मत माझ्या रिप्लाय मध्ये दर्शविलेला आहे, आणि त्या मताशी मी अजूनही बांधील आहे.

प्रश्न- आपण श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवाब मलिक यांना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामावून घेण्याबाबत काही आक्षेप नोंदविला होता का?

उत्तर- ते सरकार मध्ये नाहीत

प्रश्न- दिनांक 21 जून 2022 रोजी च्या पत्रामध्ये उपाध्यक्ष यांचा एक निर्णय होता त्या पत्रानुसार वर्षा बंगल्यावर 21 जून 2012 रोजी बैठक झाली होती त्या बैठकीला ठराव उपाध्यक्षांनी रीतसर मान्य केला होता हे खरे आहे काय?

उत्तर- अश्या पत्राबद्दल मला काही माहिती नाही.

प्रश्न- 22 जून 2022 च्या बैठकीचे पत्र सुनील प्रभू यांनी तुम्हाला पाठविले होते का ??

उत्तर-मला संतोष बांगर नावाच्या व्यक्तीने फोन केला होता आणि बोलविले होते.

प्रश्न- आपण आपल्या साक्षी पुराव्याचे शपथ पत्र सादर केले आहे त्याच्या अठरा क्रमांक मध्ये आपण असे म्हटले आहे की मी चार-पाच विधानसभा सदस्यांसोबत श्री अजय चौधरी यांना अध्यक्ष पद देण्यात येऊ नये याबद्दल आक्षेप घेतला होता मी असे सांगू इच्छितो की मी असा कोणताही अक्षय घेतला नव्हता?

उत्तर- हे चुकीचे आहे

प्रश्न- शेवटी आपण असे म्हटले आहे की एकनाथ शिंदे हे आपले खरे नेते आहेत आणि आपल्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, प्रश्न असा विचारलेला आहे की तुम्ही जेव्हा खऱ्या नेते आहे असे म्हणतात तेव्हा तुम्ही श्री एकनाथ शिंदे हे विधिमंडळ पक्षाचे नेते आहे असं म्हणत आहात का ?

उत्तर- राजकीय पक्षाचे आणि विधिमंडळ पक्षाचे

प्रश्न- आपण 22 जून 2022 रोजी बैठकीत एकनाथ शिंदे हेच आपले खरे नेते असल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला नव्हता असं माझे म्हणणे आहे हे चूक की बरोबर?

उत्तर- चुकीचे आहे

प्रश्न – या बैठकीमध्ये आम्हाला असे सुनील प्रभू यांच्याकडून सांगण्यात आले की काही शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांनी असं अगोदरच ठरवलेलं होतं की शिवसेना विधिमंडळ पक्षाचे जे सदस्य त्या बैठक उपस्थित राहणार नाही त्यांना अपात्र करण्यात याव हे खरं आहे का?

उत्तर- मला आता आठवत नाही. माझा जे म्हणणं आहे ते मी माझ्या शपथपत्र मध्ये नमूद केलेले आहे..

प्रश्न- दिनांक 22 जून 2022 रोजी सुनील प्रभू यांनी जी नोटीस पाठवली होती त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेल होत की जे विधानसभा सदस्य 22 जून 2022 रोजी च्या बैठकला उपस्थित राहणार नाही त्यांना अपात्र केले जाईल , तर हे बरोबर आहे की चूक?

उत्तर-मला आठवत नाही

प्रश्न – 22 जून 2022 च्या बैठकीत तुम्ही आणि चार ते पाच विधानसभा सदस्यांनी त्या ठरावाला कडाडून विरोध केला हे खरे आहे का?

उत्तर- प्रतिज्ञा पत्रात सादर केल्याप्रमाणे..

प्रश्न- ठरावावर अनुमोदक म्हणून आपली सही आहे हे खरे आहे का ?

उत्तर – माझी डुप्लिकेट सही केलेली आहे. ही माझी ओरिजनल सही नाही. माझी बोगस सही केली गेली आहे.

प्रश्न- 22 जून 2022 रोजीची बैठकच्या ठरावावर स्वाक्षरी केल्यानंतर आपण बैठक सोडली असे मी आपल्याला सांगू इच्छित आहे चूक की बरोबर?

उत्तर- चूक

प्रश्न – श्री एकनाथ शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून मुद्दाम आपण वेगळी सही केली हे मी आपल्याला सांगू शकतो?

उत्तर- माझी सही नाही

प्रश्न- अनुक्रमांक 38 वरील स्वाक्षरी आपली आहे का?

उत्तर- हो

प्रश्न- आपण या कागदपत्रांवर स्वाक्षरी कुठे असतांना केली?

उत्तर- आठवत नाही

प्रश्न- बाकीच्यांचे नावे आणि मतदारसंघाचे नाव हे प्रिंटेड आहे परंतु आपला आणि आपला मतदारसंघाच नाव हे हँड रिटर्न का आहे?

उत्तर-मी माझ्या हस्ताक्षरात लिहिलेलं आहे.

प्रश्न- आपलं नाव आणि आपले स्वाक्षरी हे नंतर आपण त्यामध्ये समाविष्ट केली आहे? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 20 आणि 21 जून 2022 रोजी गेलेले नव्हता , स्वाक्षरी कोणी केली?

उत्तर- मी केलेली सही माझ्या हस्ताक्षरात आहे आणि ती मीच केलेली आहे

प्रश्न- एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आपण पक्षविरोधी कारवाई केली आहे , हे चूक की बरोबर?

उत्तर- शिवसेना पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाने युती केलेली आहे.

प्रश्न- भारतीय जनता पक्षाबरोबर जे सरकार स्थापन केले होते ते श्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील आमदारांच्या एका गटाने केले होते शिवसेना पक्षाने स्थापन केला नव्हता हे चूक की बरोबर

उत्तर- शिवसेना भाजप युती आहे व त्यांच्या सरकार आहे

प्रश्न- आपण इंग्रजी लिहू वाचू शकता का?

उत्तर- नाही

प्रश्न- तो कागद बघावा आर- 18 वर आहे तो आणि अध्यक्ष महोदयांना आपण ते वाचू शकता काय हे सांगा

उत्तर- नाही, मी सुरुवातीला सांगितले की मला इंग्रजी लिहिता वाचता येत नाही..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT