Uddhav Thackeray : ‘नुसती चमकोगिरी…’, ठाकरेंचा CM शिंदेंना टोला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

बेकायदा, गद्दार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जी20 ला गेले आहेत. जो बायडेन, ऋषी सूनक सोबत काय बोलणार तुम्ही? ते काय बोलले ते तुम्हाला कळलं का? तुम्ही काय बोललात ते त्यांना कळलं का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे जळगावात वचनपूर्ती सभेत बोलत होते. या सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मणिपूरच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला आहे. (uddhav thackeray criticize cm eknath shinde pm narendra modi g20 jalgaun parivartan sabha)

ADVERTISEMENT

जळगावात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या अनावरणानंतर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. देशाचे पंतप्रधान जी20च्या लगबगीत आहेत,आमचे बेकायदा, गद्दार मुख्यमंत्री देखील तिकडे गेलेत, पण काय बोलणार तुम्ही? बायडेनशी बोलणार, ऋषी सूनक सोबत फोटो काढलात, त्यांच्याशी काय बोललात ते सांगा? कोणत्या भाषेत बोललात ते पण सांगा? ते काय बोलले ते तु्म्हाला कळलं का? तुम्ही काय बोललात ते त्यांना कळलं का? अशी ठाकरेची मुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवली. पण नुसता फोटो आला पाहिजे, नुसती चमकोगिरी करायचीय़, असा टोला ठाकरेनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

हे ही वाचा : Pankja Munde:’शिवशक्ती परिक्रमा यात्रा हाणून पाडण्याचा डाव’, पंकजा मुंडेंचा स्फोटक दावा

मणिपूरमध्ये महिलांची खुलेआम विटंबना झाली कुणीच काही बोलायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चकार शब्द काढला नाही,अशा शब्दात ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. इंडिया आघाडीवरून बोलताना ठाकरे म्हणाले की, आम्ही नुसतं नाव बदललं नाही आहे,इंडिया ही आमचीच, भारत ही आमचाच आणि हिंदुस्तानही आमचाच. यावेळेस आम्ही तिथला सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान बदलणार आहोत, असे थेट आव्हानच ठाकरेंनी भाजपला दिले.

हे वाचलं का?

भाजपाने आदर्श अशी व्यक्तीमत्व उभीच केली नाही, मग काय चोरीचं काम केली, इकडे कोण आहे वल्लभ भाई पटेल, इकडे कोण नेताजी सुभाष बाबू. आता तर माझे वडील चोरायला निघालेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला. तसेच ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सुतराम संबंध नव्हता, अशी आदर्श लोक घेऊन त्यांची दहीहंडी बांधतायत, असा टोला देखील ठाकरेंनी लगावला.

होर्डीगवरून शिंदेंना सुनावल

नुकतीच शिंदे गटाने ठाकरे गटाविरोधात बॅनरबाजी केली होती. या बॅनरबाजीवरून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.गद्दारांनी होर्डीग लावली, गद्दारांची शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेनेची काँग्रेस कदापी होणार नाही. 25-30 वर्ष जशी भाजपची शिवसेना झाली नाही, तशी काँग्रेससोबत गेल्यामुळे काँग्रेसची शिवसेना होणार नाही, असे प्रत्युत्तर ठाकरेंनी दिले आहे. मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी व्हायला देणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी व्हायला झाली नाही.अजूनही शिवसेना तीच आहे, म्हणून मी तुम्हाला कमळाबाई म्हणतोय. यापुढे सुद्धा कमळाबाई म्हणत राहेन, असे विधान करून ठाकरेंनी भाजपलाही लक्ष्य केलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘इंडिया म्हटलं की काहींना खाज सुटते’, उद्धव ठाकरेंनी मोदींना डिवचलं, काय बोलले?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT