Uddhav Thackeray : ''ना...ना...करते प्यार, तुम्ही से कर बैठे'', फडणवीसांच्या लिफ्ट भेटीनंतर ठाकरेंचं सूचक विधान
Uddhav Thackeray News : मुलींच्या मोफत शिक्षणाचं आश्वासन चंद्रकांत दादांनी दिलं होतं, आज ते मला चॉकलेट देऊन गेले. तसेच योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं. जे पोकळ ठरलं, असा टोला देखील ठाकरेंनी लगावला. आता योजनेची चॉलकेट देऊ नका. कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपत चाललीय.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet : राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीचा प्रसंग घडला. या दोन्ही नेत्यांनी विधान भवनातील (Vidhan Bhavan) लिफ्टमधून एकत्र प्रवास केला होता. या संपुर्ण प्रसंगाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. असे असताना या संपूर्ण भेटीवर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (uddhav thackeray reaction on devendra fadnavis lift meeting vidhan bhavan maharashtra politics)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी अनेक मुद्यावर भाष्य केले आहे. विधानभवन परिसरात आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या भेटीवर उद्धव ठाकरे म्हणाले की, ना... ना... करते प्यार, तुम्ही से कर बैठे असे होणार नाही आता, तसेच याचा पटोलेशी काही संबंध नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना चॉकलेट, कोणाला केलं चेकमेट?
तसेच लिफ्टमध्ये झालेली भेट योगायोगाने घडली आहे. भिंतीला कान असतात, पण लिफ्टच्या भिंतीला कान असतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठका लिफ्टमध्येच घेऊ, असे देखील ठाकरेंने यावेळी मिश्किलपणे सांगितले.
हे वाचलं का?
मुलींच्या मोफत शिक्षणाचं आश्वासन चंद्रकांत दादांनी दिलं होतं, आज ते मला चॉकलेट देऊन गेले. तसेच योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं. जे पोकळ ठरलं, असा टोला देखील ठाकरेंनी लगावला. आता योजनेची चॉलकेट देऊ नका. कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपत चाललीय. लोकसभेच्या निकालानंतर त्यांना जरी कळलं नसलं तरी आम्हाला कळलं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
फडणवीसांवर पलटवार
उद्धव ठाकरे यांनी यावेळी फडणवीसांना देखील प्रत्युत्तर दिले. माझ्या काळात कोरोना होता. पेपरफुटीचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही परिक्षा रद्द करून पुन्हा परिक्षा घेतल्या. त्यानंतर कोणत्या परिक्षा झाल्या ज्याचे पेपर फुटले? हा नरेटिव्ह शब्द आणला तो हाच नरेटिव्ह आहे, खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ajit Pawar : ''अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा'' BJP नेत्याची खदखद
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT