Maharashtra Monsoon Session 2024: चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना चॉकलेट, कोणाला केलं चेकमेट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना चॉकलेट, कोणाला केलं चेकमेट?
चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना चॉकलेट, कोणाला केलं चेकमेट?
social share
google news

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एक मोठी घडामोड घडली आहे. मागील पाच वर्षांपासून दूर असलेले भाजप-शिवसेना (UBT) नेते आज अचानक एकमेकांना भेटू लागले आहेत. एवढंच नव्हे तर भाजपचे दिग्गज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (27 जून) अचानक विधीमंडळात अंबादास दानवेंच्या दालनात जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना चक्क चॉकलेटही दिलं. (maharashtra monsoon session 2024 chandrakant patil met uddhav thackeray and gave him chocolate who did the checkmate)

चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना का दिलं चॉकलेट?

आज (27 जून) अचानक भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात या दोन्ही नेत्यांची भेट झाली.

हे ही वाचा>> मोठी बातमी... ठाकरे-फडणवीसांची भेट, लिफ्टच्या बंद दाराआड काय ठरलं?

अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली आणि त्यांना फुलांचा बुकेही दिला. तर त्याचवेळी अंबादास दानवेंनी चंद्रकांत पाटलांना पेढा दिला. यानंतर चंद्रकांत पाटलांनी दानवे आणि उद्धव ठाकरेंनी एक भलं मोठं चॉकलेटही दिलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सगळ्यात महत्त्वाची बाबा म्हणजे चंद्रकांत पाटलांनी शिवसेना (UBT) नेते आणि पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या अनिल परब यांचे अॅडव्हान्समध्ये स्वागतही केलं. 

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंसोबत भाजप नेत्यांची जवळकी, नेमका कोणाला इशारा?

राज्यात दोन वर्षांपूर्वी भाजपने एकनाथ शिंदेंनी सत्ता स्थापन केली. त्यावेळी अनेकांचा होरा चुकवत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पद मिळवलं होतं. पण तेव्हापासूनच भाजप आणि शिंदे गटात सारं काही आलबेल नव्हतं. मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षात कुरबुरी या सुरूच आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना...', मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान!

अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं.. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास.. या सगळ्या गोष्टी नक्कीच राजकीय संदेश देणाऱ्या आहेत. त्यामुळे आतापासून राजकीय पटलावरील बुद्धीबळाला सुरुवात झाली असून.. प्रत्येक जण एकमेकांना खिंडीत गाठायचा प्रयत्न करतोय. ज्याची नांदी ही आजपासून सुरू झालीए असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT