Maharashtra Monsoon Session 2024: मोठी बातमी... उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, लिफ्टच्या बंद दाराआड काय ठरलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मोठी बातमी... ठाकरे-फडणवीसांची भेट, लिफ्टच्या बंद दाराआड काय ठरलं?
मोठी बातमी... ठाकरे-फडणवीसांची भेट, लिफ्टच्या बंद दाराआड काय ठरलं?
social share
google news

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis: मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (27 जून) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी घडामोड घडली आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवन परिसरात भेट झाली. ज्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. याच लिफ्टच्या दाराआड नेमकं काय ठरलं याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. (maharashtra monsoon session 2024 big news shiv sena ubt uddhav thackeray dcm devendra fadnavis meeting what happened behind closed doors of the vidhan bhavan lift)

ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर... लिफ्टच्या बंद दाराआड नेमकी काय चर्चा?

राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी हे अधिवेशन शिंदे सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे. ज्या पद्धतीने भाजपच्या साथीने एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापन केलेलं. तेव्हापासून ठाकरे आणि भाजपमध्ये विशेषतः फडणवीसांमध्ये बराच दुरावा आला होता. 

मात्र, आज दोन्ही नेते एकाच वेळी समोरासमोर आले. विधानपरिषदेचं कामकाज आज सुरू होत होतं तेव्हा तळ मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच ठिकाणी थांबले होते. यावेळी दोघेही लिफ्टसाठी वाट पाहत होते. तेव्हा त्यांच्यात काही क्षण संवादही झाला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यानंतर हे दोन्ही नेते एकाच लिफ्टमध्ये गेले. पुढे हे दोन्ही नेते सभागृहात निघून गेले. पण लिफ्टमधील काहीकाही क्षण फडणवीस आणि ठाकरेंची चर्चा झाली. पण ही चर्चा नेमकी काय झाली याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. 

दरम्यान, यावेळी लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मिलिंद नार्वेकर, प्रविण दरेकर आणि छगन भुजबळ हेही होते. 

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट, चॉकलेटही दिलं.. 

दरम्यान, याआधी आज (27 जून) अचानक भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. 

ADVERTISEMENT

यावेळी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटलांना पेढाही दिला. तर चंद्रकांत पाटलांनी दानवे आणि उद्धव ठाकरेंनी एक भलं मोठं चॉकलेटही दिलं. 

या सगळ्यात महत्त्वाची बाबा म्हणजे चंद्रकांत पाटलांनी शिवसेना (UBT) नेते आणि पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या अनिल परब यांचे अॅडव्हान्समध्ये स्वागतही केलं. 

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

या भेटीने कोणाचं वाढलं टेन्शन?

ज्या पद्धतीने आज भाजपच्या बाजूने घडामोडी घडत आहेत ते पाहता देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय विरोधकांना नक्कीच काही तरी मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान या सगळ्या घटनांमुळे शिंदे गटाच्या नेत्यांना मात्र माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT