Shiv Sena: खरी आणि खोटी शिवसेना यांच्यातील लढाईत कोण जिंकणार? महाराष्ट्राचा किंग आणि किंगमेकर कोण?
Shiv Sena Battle: महाराष्ट्राच्या राजकारणात खरी आणि खोटी शिवसेना अशी लढाई सुरू आहे. खरी आणि खोटी शिवसेना यांच्यातील लढाईत जनमानसात कोण जिंकत आहे? मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण आकडेवारी काय दर्शवते?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
खरी शिवसेना नेमकी कोणाची?
विधानसभा निवडणुकीत खऱ्या शिवसेनेचाही लागणार निकाल?
शिंदे की ठाकरे? महाराष्ट्राची जनता कोणाला देणार कौल?
मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर महाराष्ट्राचा राजकीय चित्र बदललं आहे. खऱ्या-खोट्या पक्षांमधील लढत निवडणूक आयोगाच्या पातळीवर पोहोचली. निवडणूक आयोगाचा निर्णय बंडखोर गटांच्या बाजूने आला. शिवसेनेचं नाव आणि चिन्हाच्या लढतीत निवडणूक आयोगाचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने आला. तर राष्ट्रवादीच्या बाबतीत लढाई जिंकण्यात अजित पवारांना यश आले. (vidhan sabha election 2024 who is winning public perception in battle between real and fake shiv sena who is king and kingmaker of maharashtra)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंना स्वतःच्या वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षावरील हक्क सोडून नवा पक्ष काढावा लागला. शरद पवारांनीही नवा पक्ष काढला. पण वाद सुरूच राहिला – खरा पक्ष कोणाचा? दोन्ही पक्षातील चारही गट स्वतःला खरा पक्ष म्हणवून घेत आहेत. याबाबत जनतेची धारणा काय आहे?
खरी आणि खोटी शिवसेना यांच्यातील लढाईत कोण जिंकणार?
उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष शिवसेना (UBT) ही खरी शिवसेना म्हणत असताना, शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे आहे. शिंदे यांचाही स्वतःचा दावा आहे. एकनाथ शिंदे यांना गद्दार ठरवून ठाकरे गट जनतेत जाण्याची भाषा करत आहे. बाळासाहेबांच्या वारशाचा खरा वारसदार म्हणून शिंदे गट स्वत:ला जनतेसमोर प्रोजेक्ट करत आहे. निवडणूक आयोगातील लढाईत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे जनतेच्या दरबारातच निर्णय होईल असं सातत्याने बोलत आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Uddhav Thackeray : ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! 36 विधानसभा मतदारसंघांसाठी ठरली रणनिती
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या, पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका निर्णयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. खरी आणि खोटी शिवसेना यांच्यातील लढाईत जनतेचं परसेप्शन काय आहे आणि तिथं कोण बाजी मारतं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. इंडिया टुडे-सी व्होटर्स मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणातील आकडेवारी या लढतीत शिंदे गटासाठी चांगले संकेत देत आहे.
या सर्वेक्षणानुसार 25 टक्के लोक सरकारच्या कामावर समाधानी आहेत, तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामावर समाधानी लोकांची संख्या 35 टक्के आहे. 34 टक्के लोक सरकारच्या कामावर काही प्रमाणात समाधानी आहेत, पण मुख्यमंत्र्यांच्या कामाचा विचार केला तर हा आकडाही 31 टक्क्यांवर येतो. मुख्यमंत्र्यांच्या कामावर असंतुष्ट लोकांची संख्याही सरकारच्या तुलनेत कमी आहे. 34 टक्के लोक सरकारच्या कामावर असमाधानी आहेत, तर 28 टक्के लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर असमाधानी आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून वाढलेला आलेखही परसेप्शनच्या लढाईत उद्धव ठाकरे यांच्या पुढे जाण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
राजकीय तज्ज्ञांचं काय मत?
एकनाथ शिंदे यांना अप्रूव्हल रेटिंग मिळत आहे. त्यामुळे तूर्तास गद्दारीचा फॅक्टर चालत नसल्याचं दिसतंय. या प्रश्नाला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार आशुतोष म्हणाले की, 'शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता वाढत असेल तर ते भाजपसाठी चिंतेचे कारण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही हे चिंतेचे कारण आहे. शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून भाजप निवडणुकीत उतरणार की देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा, हा प्रश्न राहणार आहे.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> BJP vs Shiv sena: '30 वर्ष शिवसेनेत होते काय उ$%#?, तोंड फोडल्याशिवाय...', मंत्री रवींद्र चव्हाणांचा तोल ढळला
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम म्हणाले की, 'महाराष्ट्रातील जनतेने आधीच्या आणि आताच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन केले आहे. पूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकवर संवाद साधायचे, एकनाथ शिंदे समोरासमोर संवाद साधतात आणि लोकांमध्ये राहतात. जनतेने याला मान्यता दिली आहे.'
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'स्ट्राइक रेट पहा. शिवसेनेने 15 जागांवर निवडणूक लढवली आणि सात जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 21-22 जागा लढवून नऊ जागा जिंकल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी महाराष्ट्रात निवडणूक जिंकून पुन्हा सरकार स्थापन करेल.' असा दावा संजय निरुपम यांनी केला.
अजित पवारांच्या पक्षापेक्षा शरद पवारांचा पक्ष ठरला वरचढ
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने अजित पवार गटाचा पराभव केला होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली. तर शरद पवार यांच्या पक्षाला आठ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या या निकालाकडे राष्ट्रवादीचा खरा जनादेश म्हणून पाहिले जात होते.
खऱ्या-खोट्या शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसही विधानसभा निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रातील या निवडणुका केवळ उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय दिशा ठरवणार नाहीत, तर महाराष्ट्राचा किंग आणि किंगमेकर कोण होणार हे ही ठरवणारी आहे?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT