Uddhav Thackeray : ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! 36 विधानसभा मतदारसंघांसाठी ठरली रणनिती
Uddhav Thackeray News : महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघात 13 आणि 14 ऑगस्टला शिव सर्वेक्षण अभियान ठाकरे गटाकडून राबवण्यात आलं होतं. या अभियानानंतर ठाकरे गटाने 'मिशन मुंबई'वर लक्ष केंद्रित केले आहे. आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच 36 विधानसभा मतदारसंघात हे शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ठाकरे गटाने 'मिशन मुंबई'वर लक्ष केंद्रित केले आहे.
36 विधानसभा मतदारसंघात हे शिव सर्वेक्षण अभियान राबवणार
मुंबईत शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.
Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. त्यानुसार मतदार संघाचा आढावा आणि जोरबैठका घ्यायला सुरुवात झालीय. त्यात शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ठाकरे (Uddhav Thackeray) विरूद्ध शिंदे (Eknath Shinde) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानसभेचं मैदान कोण मारतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) रणनिती आखली असून सर्व मतदार संघाचा अभ्यास करण्यासाठी शिव सर्वेक्षण अभियान राबवलं होतं. (uddhav thackeray mission mumbai for maharashtra assembly election shiv sena list of leader for survey in mumbai 36 vidhan sabha seat)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघात 13 आणि 14 ऑगस्टला शिव सर्वेक्षण अभियान ठाकरे गटाकडून राबवण्यात आलं होतं. या अभियानानंतर ठाकरे गटाने 'मिशन मुंबई'वर लक्ष केंद्रित केले आहे. आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच 36 विधानसभा मतदारसंघात हे शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, 'त्या' महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे त्यामुळे आता मुंबईत शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.
हे वाचलं का?
अभियानासाठी प्रमुख नेत्यांची नियुक्ती
विनायक राऊत : वरळी, दादर- माहीम
अनिल देसाईं : जोगेश्वरी आणि अंधेरी
अनिल परब : मागाठाणे, दहिसर
राजन विचारे : विलेपार्ले, कालिना
मिलिंद नार्वेकर : दिंडोशी, गोरेगाव
सुनील प्रभू : मुलुंड, भांडुप
अजय चौधरी : चेंबूर, अणुशक्तीनगर
सचिन अहिर : कुलाबा, मुंबा देवी
विलास पोतनीस : शिवडी आणि मलबार हिल
वरून सरदेसाई : सायन कोळीवाडा, धारावी
कुणावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?
विनायक राऊत : वरळी, माहिम
सुनील शिंदे : विक्रोळी, घाटकोपर (पु)
दत्ता दळवी : कुर्ला, चांदिवली
अनिल देसाई : जोगेश्वरी (पु), अंधेरी (पु)
अनिल परब : मागाठाणे, दहिसर
सुनील प्रभू : मुलुंड, भांडूप (प)
अरविंद सावंत : अंधेरी (प), वर्सोवा
राजन विचारे : विलेपार्ले, कलिना
सुनिल राऊत : वांद्रे (पु), वांद्रे (प)
वरुण सरदेसाई : सायन कोळीवाडा, धारावी
मिलींद नार्वेकर : दिंडोशी, गोरेगाव
रमेश कोरगांवकर : बोरीवली, कांदिवली
मनोज जामसुतकर : चारकोप, मालाड
अजय चौधरी : चेंबुर, अणुशक्तीनगर
विलास पोतनीस : शिवडी, मलबार हिल
विनोद घोसाळकर : वडाळा, भायखळा
सचिन अहिर : कुलाबा, मुंबादेवी
अमोल कीर्तिकर : घाटकोपर (प), मानखुर्द-शिवाजीनगर
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Husain Dalwai : ''उद्या कुणी प्रभू रामाबद्दल बोलले तर...'', रामगिरी महाराजांच्या विधानावर काँग्रेस नेता काय म्हणाला?
मुंबईत शिव सर्वेक्षण अभियानासाठी प्रत्येक नेत्यावर दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना सादर केले जाणार आहे. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखली जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT