Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, 'त्या' महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme those women   applying after 31st july what about there installment mukhymantri ladki bahin yojana scheme
लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलाय

point

या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार

point

सरकारने दिली मोठी माहिती

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे हफ्ते म्हणजेच 3 हजार रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांनी 1 ते 31 जुलैपर्यंत अर्ज केले आहेत. त्यांच्याच खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे आता 31 जुलैनंतर अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात (Women Bank Account) पैसे कधी जमा होणार? असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित होतं आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. (ladki bahin yojana scheme those women applying after 31st july what about there installment mukhymantri ladki bahin yojana scheme)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक अटी, शर्थींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 15 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही. तर काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला. आता या महिल्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार, ते जमा होणार की नाही? असे असंख्य प्रश्न महिलांना पडले आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

हे ही वाचा : Gold Price Today: अगं बाई, काय हे... केवढं महाग ते 'सोनं'! आजचा भाव बघितला का?

पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला आहे. या कार्यक्रमात महायुती सरकारने योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. विरोधक आरोप करतात दोन-तीन महिने पैसे मिळणार, मग पैसे मिळणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्चपर्यंतची सगळी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला तर पुढच्या मार्चपर्यंतची व्यवस्था करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

हे वाचलं का?

दरम्यान 31 जुलैपर्यंतचे फॉर्म घेतले त्याचे पैसे आले आहेत. आता 31 ऑगस्टच्या फॉर्मची छाननी होईल, तेव्हा या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे येतील. ही खटाखट योजना नाही तर फटाफट योजना आहे. थेट पैसे खात्यात जातात, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

'या' कारणामुळे फॉर्म रिजेक्ट

आम्ही योजनेची घोषणा केल्यानंतर तुमच्या सावत्र भावांच्या पोटात खूप दुखायला लागलं. मग सावत्र भावाने योजना बंद व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले. पहिल्यांदा कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि पुरूषांचे फोटो लावले. जेणेकरून महिलांना सांगता येईल, तुमचे अर्ज भरलेत,पण सरकारने ते स्विकारले नाहीत. काही ठिकाणी मोटरसायकल, तर काही ठिकाणी बागेचे फोटो लावले. जेणेकरून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे आणि महिलांपर्यत पैसे पोहौचू नये असा आरोप फडणवीसांनी विरोधकांवर केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : MHADA lottery 2024 : म्हाडाचं घर खरेदी करायचंय? ऑनलाईन प्रक्रिया माहितीय का? म्हाडाचं प्रसिद्धीपत्रक एकदा वाचाच

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT