Gold Price Today: अगं बाई, काय हे... केवढं महाग ते 'सोनं'! आजचा भाव बघितला का?
Gold Rate : रक्षाबंधनाचा सण येऊ घातलेला असताना सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सोने-चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रक्षाबंधनाचा सण येऊ घातलेला असताना सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे.
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव किती?
सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार
Gold-Silver Price Hike : रक्षाबंधनाचा सण येऊ घातलेला असताना सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सोने-चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत. यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर यामध्ये घसरण पाहायला मिळाली होती पण आता हे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. अशावेळी आज (18 ऑगस्ट) सोन्याचे भाव कितीने वाढले आहेत जाणूत घेऊयात. (gold-silver price rises today 18th august before rakshabandhan in maharashtra know the details )
खरं तर, आज सोनयाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आहे. मात्र शनिवारी (17 ऑगस्ट) देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचे दर प्रचंड वाढले होते. हे दर आज रविवार असल्याने कायम राहणार आहेत.
हेही वाचा : Ajit Pawar: सुप्रिया सुळेंना राखी बांधणार का? अजितदादांनी दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय म्हणाले?
Goodreturns वेबसाइटनुसार, 17 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) 1150 रुपयांनी वाढला होता. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 860 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढलेला. यानुसार, 22 कॅरेट प्रति ग्रॅम 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,700 रूपये आहे. तर, 24 कॅरेट प्रति ग्रॅम 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,770 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 86,000 रूपये इतकी झाली आहे.
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव किती?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 700 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 770 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 570 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 700 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 770 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 570 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 700 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 770 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 570 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 730 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 600 रूपये आहे.
जळगाव
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 700 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 770 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 570 रूपये आहे.
हेही वाचा : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम? अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया चर्चेत
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.