Sanjay Raut यांची सुपारी? कोण आहे कुख्यात गुंड राजा ठाकूर?
Shivsena (UBT) Sanjay Raut | Raja Thackur : मुंबई : शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. याबाबत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT
Shivsena (UBT) Sanjay Raut | Raja Thackur :
ADVERTISEMENT
मुंबई : शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. याबाबत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं असून, त्यात त्यांनी श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. ( Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut has alleged that Srikant Shinde gave Contract to the notorious gangster Raja Thakur of Thane to attack me.)
हे वाचलं का?
संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
प्रिय देवेंद्रजी,
जय महाराष्ट्र
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
‘श्रीकांत शिंदेंनी माझी सुपारी दिलीये’, राऊतांचं फडणवीसांना खळबळजनक पत्र
कोण आहे राजा ठाकूर?
राजा ठाकूर हा ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागातील कुख्यात गुंड आहे. टोळ्याच्या माध्यमातून हत्या, हत्येचा आरोप असे अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हेही दाखल आहेत. त्याचं दीपक पाटील गटाशी वैर आहे. राजा ठाकूर हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय मानला जातो. यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यक्रमांमध्ये तो दिसून आला आहे.
संजय राऊतांवर हल्ल्याची सुपारी दिल्याचं प्रकरण, आदित्य ठाकरे म्हणाले, ‘गद्दार…’
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राबद्दल बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडतायेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ज्या गद्दार आमदारांनी गोळीबार केला, त्यांच्यावर कुठेच कारवाई झाली नाही. अनेक गद्दार आहेत, ज्यांनी धक्काबुक्की किंवा इतर काही केलंय; त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रश्न येतोच ना कि कायदा सुवेवस्था नाही”, असं आदित्य ठाकरेंनी यांनी म्हटलं आहे.
केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी हा प्रकार :
दरम्यान, केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचं शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. संजय राऊत आणि त्यांचा भाऊ हे भांडवल बादशहा असल्याचा आरोप देखील यावेळी मस्के यांनी केला. तसंच मागील अनेक दिवसांपासून खासदार श्रीकांत शिंदे हे आजारी असल्यामुळे रुग्णालयात होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे असे प्रकार होणार नसल्याचंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT