CP Radhakrishnan : कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल राधाकृष्णन?
Maharashtra New Governor : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत?
महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द
Who is CP Radhakrishnan : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (27 जुलै) राष्ट्रपती भवनाकडून राधाकृष्णन यांच्यासह इतर राज्यातील काही राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आले. (C.P. Radhakrishnan is new Governor of Maharashtra)
झारखंडचे राज्यपाल आणि तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त प्रभार असलेल्या सी.पी. राधाकृष्णन यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल आहेत.
कोण आहेत सीपी राधाकृष्णन?
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले सी.पी. राधाकृष्णन यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते.
हेही वाचा >> टेन्शन आल्यावर शरद पवार काय करतात, पहिल्यांदाच केला खुलासा
राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या वरिष्ठ आणि सन्मानित नेत्यांपैकी एक आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केरळचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.










