Devendra Fadnavis : मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, पांडेंना काम दिलेलं

Thackeray government was planed to Arrest me : फडणवीसांच्या या आरोपांवर तत्कालिन गृहमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी.
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केले गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केले गंभीर आरोपMumbai Tak

Thackeray government was planed to Arrest me: मुंबई: महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना हे टार्गेट दिलं होतं, असा मोठा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. (Thackeray government was planed to Arrest me)

या कार्यक्रमादरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तुमचे आता राजकीयसह वैयक्तिक संबंधही बिघडले असल्याचं जाणवत असल्याचा प्रश्न फडणवीसांना विचारला होता. यावर ते म्हणाले, मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकारही सुडबुद्धीने वागणार नाही. पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आणि मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता.

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केले गंभीर आरोप
Balasaheb: राज-शिंदे, फडणवीस एकत्र, बाळासाहेबांबद्दल काय म्हणाले?

एवढचं नाही तर यासाठी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं, असाही आरोप फडणवीसांनी केला. ते पुढे म्हणाले, अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते मला तुरुंगात टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. पण कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा आणि तुरुंगात टाका, असे आदेश ठाकरे सरकारचे होते. हेदेखील सत्य आहे. पोलीस प्रशासनातील कोणालाही विचारलं, तर तेदेखील हेच सांगतील, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केले गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट परतणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दरम्यान, तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न किंवा कोणतीही योजना महाविकास आघाडी सरकारची नव्हती. ते काय बोललेत मी ऐकलं नाही. परंतु, असा कोणताही प्रयत्न किंवा योजना महाविकास आघाडी सरकारची नव्हती. ते त्यांच्या माहितीच्या आधारावर बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार सरकारनं असं काहीही केलं नव्हतं, असा खुलासा फडणवीस यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in