विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी सुब्रमण्यम स्वामींचा लढा; कायदेतज्ञांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

मुंबई तक

पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारपासून मुक्त करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कायदेशीर लढ्याला सुरुवात केली आहे. यात त्यांनी रविवारी नवी दिल्ली येथे यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची एक बैठक घेतली. या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. स्वामी यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारपासून मुक्त करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कायदेशीर लढ्याला सुरुवात केली आहे. यात त्यांनी रविवारी नवी दिल्ली येथे यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची एक बैठक घेतली. या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. स्वामी यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून 7 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. विधिज्ञ सत्या सब्रवाल, विधिज्ञ विशेष कोनोडीया यांच्यामार्फत मुंबई न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबरला डॉ. स्वामी हे पंढरपूर येथे भेट देणार आहेत. यावेळी ते वारकरी संप्रदाय व विठ्ठल भक्तांची बैठकही घेणार आहेत.

स्वामी यांच्या या भुमिकेमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा लढा पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक दशकांपासूनचे मंदिरातील बडवे उत्पात यांचे हक्क संपवत जानेवारी 2014 रोजी सर्वोच्य न्यायालयाने मंदिराचा संपूर्ण ताबा शासनाकडे दिला होता. त्यानंतर आता हे मंदिर शासनाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा लढा सुरु होत आहे. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात कोर्टाकडून काय निर्देश दिले जातात याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मागील महिन्यात वारकरी संप्रदायातील काही महाराजांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. पंढरपुरात हिंदू भक्तांना त्रास दिला जातो. सरकारने हिंदू मंदिरं हडपली आहेत, हिंदूंच्या पुनर्उत्थानासाठी हे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले होते. याशिवाय आते ते लवकरच पंढरपूरलाही भेट देणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp