
खेड : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (शनिवारी) खेड येथील मैदानावर जाहीर सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असून गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते मंत्री उदय सामंत (Uday Samant), माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह शिंदेच्या शिवसेनेतील इतर नेत्यांवर तोंडसुख घेण्याची शक्यता आहे. uddhav thackeray's rally shivsena leader ramdas kadam