VIDEO: कसब्याचा निकाल लागताच अजित पवारांनी केली CM शिंदेंची नक्कल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ajit Pawar mimicked Chief Minister Shinde: मुंबई: कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election) बलाढ्य भाजपचे उमेदवार (BJP) हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) पराभव केला केल्या राज्यातील विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याचविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचीच नक्कल (Mimicry) केली आहे. (video ajit pawar mimicked cm eknath shinde as soon as kasba by election results were announced)

‘मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी सर्वसामान्यांना भेटणार.. पण सर्वसामान्यांना भेटून पण सर्वसामान्यांनीच पराभव केला…’ अशी नक्कल अजित पवार यांनी यावेळी केली.

पाहा अजित पवार नेमकी कशी केली CM शिंदेंची मिमिक्री

‘शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाचा हा 100 टक्के पराभव आहे. त्या दोघांनीच तिथे बस्तान टाकलं होतं.. ते दोघंच तिथे ठासून बसलेले होते. मी म्हटलं की, अहो राज्याचे मुख्यमंत्री कधी रोड शो घेतात का? तर त्यांनी मला ऐकवलं..’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

म्हणाले, (एकनाथ शिंदेंची नक्कल करत) ‘मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी सर्वसामान्यांना भेटणार.. पण सर्वसामान्यांना भेटून पण सर्वसामान्यांनीच पराभव केला… आता हे लक्षात घ्या.. हा..’

Narayan Rane: ‘अजित पवार पुण्याला येऊन बारा वाजवीन मी’, ‘त्या’ विधानावरुन राणे संतापले

‘अंहमपणा दाखवू नका’, भाजपला सुनावलं

ADVERTISEMENT

‘मतदारांनीच त्यांना सागितलं की, कोण आहे धंगेकर.. रवींद्र धंगेकर कोण आहेत ते सांगितलं.. मी तुम्हाला सांगतो की, आम्ही सत्तेवर असो किंवा विरोधी पक्षात असो.. आपण केव्हाही मतदारांना गृहीत धरता कामा नये. मतदार राजा आहे. त्यांना त्यांचा मानसन्मान दिलाच पाहिजे. त्यांना व्यवस्थितपणे सांगण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही काही करू शकतो, आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो हा अंहमपणा दाखवण्याचं कारण नाही.’

ADVERTISEMENT

भाषण देताना भान ठेवा, आपल्या नेत्यांना दिल्या अजित पवारांनी कानपिचक्या

‘आमचा एक काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने भाषण देताना थोडसं वेगळ्या पद्धतीने.. ते तसं अजिबात द्यायला नको.. तुम्ही भाषण देताना सांगायला हवं की, जेवढे काही मतदार बाहेर आहेत ते जगात असतील देशात असतील राज्यात असतील त्यांनी मतदानासाठी यावं. तुम्ही ठराविक असं सांगितलं तर कारण नसताना त्याचा बाऊ होऊ शकतो.. मतदारांच्या रूपाने..’

Maharashtra Budget Session LIVE : अजित पवार-आशिष शेलारांमध्ये खडाजंगी

‘मी-मी म्हणाऱ्यांना जनतेने पराभूत केलंय’

‘काही जण म्हणायचे नाही तिसरा राऊंड, चौथा राऊंड आमचा बालेकिल्ला आहे.. आम्हालाच मतदान मिळणार.. पण असं नसतं.. मतदारांना जे योग्य वाटतं तेच ते करतात. मी-मी म्हणणाऱ्यांना जनतेने पराभूत केलंय. मी-मी म्हणाऱ्यांना घरी असताना आमदार, खासदार केलेलं पाहिलं आहे.’ असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर देखील टीकेची झोड उठवली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT