IRS अधिकारी समीर वानखेडेंची 'ही' मोठी अडचण, नेमकं घडलंय तरी काय?
IRS Sameer Wankhede: समीर वानखेडे हे लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी त्यांच्यासमोर काही अडचणी देखील आहेत.

ADVERTISEMENT
Sameer Wankhede Vidhansabha Election 2024: मुंबई: महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलंय. 20 नोव्हेंबरला निवडणूक आणि 23 नोव्हेंबरला निकाल येतोय. आता यासाठीही फिल्डिंग लावण्याचं काम सगळे पक्ष करताहेत. शिवाय अनेक नेते आणि चर्चेत असलेली मंडळी देखील लगबगीनं कामाला लागलीत. यातच आता डॅशिंग आणि प्रचंड चर्चेत आलेले IRS अधिकारी समीर वानखेडे हे देखील महाराष्ट्र विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जातंय. त्यांचा पक्ष आणि मतदारसंघ सुद्धा ठरलाय. पण काही अडचणी आहेत ज्या त्यांना या निवडणुकीपासून दूर लोटू शकतात. त्या अडचणी काय आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (a big problem for irs officer sameer wankhede in contesting maharashtra assembly elections what actually happened)
समीर वानखेडे हे कोणत्या पक्षाकडून लढणार? मतदारसंघ कोणता आणि गणित कसं असेल याबाबतही नेमकी माहिती समजून घेऊया.
समीर वानखेडे 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक?
शाहरुख खानसह अनेक सेलिब्रेटींना घाम फोडणारे शिवाय नवाब मलिकांसह अनेक नेत्यांना नडणारे समीर वानखेडे देशभरात चर्चेत आले होते. याशिवाय मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंन्सीसह पकडणं असो किंवा अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे टाकणे असो, किंवा बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणं बाहेर काढण्याच्या कारवायांमागे समीर वानखेडे यांचं नेतृत्त्व होतं.
हे ही वाचा>> Baba Siddique Case : "बाबा सिद्दीकी काय भला माणूस नव्हता...", दिल्लीत पकडलेला शार्प शूटर काय म्हणाला?
आता वानखेडे राजकारण एन्ट्री करताहेत हे जवळपास फिक्स झालं आहे. शिवाय ते काही दिवसांवर आलेली विधानसभा निवडणूक देखील लढवणार आहेत. ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.