Ravindra Waikar : ठाकरेंचे विश्वासू वायकर खरंच शिंदें गटात जाताहेत का?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले नेते रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का?

social share
google news

Ravindra Waikar Eknath shinde Shiv Sena : जोगेश्वरीतील एका भूखंडामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वायकरांविरुद्ध ईडीची कारवाई सुरू आहे. त्याची चौकशी सुरू असतानाच आता ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. (Ravindra Waikar, Leader of Uddhav Thackeray's Shiv Sena may be join Eknath shinde's Shiv Sena)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

8 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. ज्यात रवींद्र वायकर यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबतचा फोटो शेअर केलेला होता. त्याचबरोबर, राऊतांनी असं म्हटलेलं होतं की, "शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे."

"येत्या काही दिवसात शिवसेना सोडा... पक्षांतर करा... नाहीतर तुरुंगात जा, असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील व जिंकतील.आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत", असे त्यांनी म्हटले होते. मात्र, ते शिंदेंच्या सेनेत जाणार या चर्चांना त्यामुळे आणखी हवा मिळाली. नेमंक पडद्यामागे काय घडतंय, तेच समजून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT