Baramati Lok sabha 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार मैदानात! प्रचार सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Baramati Lok Sabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार, असेच संकेत मिळत आहेत.

social share
google news

Supriya Sule Vs Sunetra Pawar Baramati Lok sabha 2024 : (वसंत पवार, बारामती)  बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार जवळच्या व्यक्तीलाच उमेदवारी देतील, अशी चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवार पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देतील, अशी चर्चा असतानाच आता बारामतीत प्रचारही सुरू झाला आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रचार रथही रस्त्यावर फिरू लागले आहेत. 

'बारामती लोकसभा मतदारसंघातून मला माझ्या विचारांचा खासदार हवा आहे', असे सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरुद्ध उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. 'मी उमेदवार आहे, असे समजून मतदान करा', असंही अजित पवार म्हणाले होते. तेव्हापासून सगळ्यांना अजित पवार कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे.

सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार दत्ता भरणे किंवा सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देतील, असेही म्हटले जात आहे. मात्र, आता सुनेत्रा पवारांच्या कार्याची माहिती देणारे बॅनर्स आणि प्रचार रथ फिरू लागले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारच बारामतीतून निवडणूक लढवणार, असं म्हटलं जात आहे. 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT