Uddhav Thackeray : केजरीवालांनंतर ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र हादरणार!
Uddhav Thackeray News : भाजपने उद्धव ठाकरे यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांवर तपास यंत्रणांकडून कारवाई होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray News : भाजपने उद्धव ठाकरे यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांवर तपास यंत्रणांकडून कारवाई होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Uddhav Thackeray Maharashtra Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. या अटकेचे राजकीय पडसाद महाराष्ट्रातही उमटले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. दुसरा आणखी मुद्दा चर्चेत आला तो, आता पुढचा क्रमांक कुणाचा. कारण आधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली गेली, त्यानंतर केजरीवाल. महाराष्ट्रात अशीच कारवाई ठाकरेंविरुद्ध होऊ शकते, या चर्चेने तोंड वर काढलं आहे. भाजपच्या नेत्यांकडून जाहीरपण तसे संकेत दिले जात आहेत. तेच समजून घ्या...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ठाकरेंच्या दिशेने मोर्चा... क्रोनोलॉजी बघा
अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यानंतर लगेच भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले. ते म्हणाले की, "भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांमुळे विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगात जाऊ शकतो तर टक्केवारीवाला माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतो." भातखळकरांच्या या पोस्टनंतर गुरुवारी (२२ मार्च) किरीट सोमय्यांनी मद्य धोरणाचा मुद्दा काढला.
हेही वाचा >> ठाकरेंची शिवसेना जिंकणार महाराष्ट्रातील 'एवढ्या' जागा, ही आहे संपूर्ण यादी!
किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात की, "ठाकरे सरकारनेही जानेवारी 2022 मध्ये वाईन घोटाळा केला होता. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अबकारी मद्य धोरण जानेवारी 2022 मध्ये बदलले होते."
हे वाचलं का?
"संजय राऊतांच्या कुटुंबाने अशोक गर्ग मॅगपाई डीएफएस प्रा. लि.च्या माध्यमातून महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. आम्ही महाराष्ट्रातील हा वाईन/मद्य घोटाळा उघडकीस आणला होता", असे सोमय्यांनी म्हटले आहे. सोमय्या यांच्या पोस्टनंतर आमदार नितेश राणेंनी तर याचे संकेतच दिलेत.
नितेश राणेंनी 'त्या' भेटीवरच घेतली शंका... अटकेबद्दल दिले संकेत
"संजय राजाराम राऊत हा अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजप आणि आमच्या नेत्यांवर फार आगपाखड करत होता. पण, यानिमित्ताने मला काही महिन्याअगोदर मातोश्रीवर झालेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी, उद्धवजींच्या कुटुंबीयासोबत झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहेत. ती नेमकी भेट कशासाठी होती."
ADVERTISEMENT
"ती राजकीय भेट होती, सदिच्छा भेट होती की, त्या भेटीच्या मागे मद्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन दडलेलं? कारण की महाविकास आघाडीचे सरकार असताना दिल्लीच्या सरकारने जेव्हा मद्य धोरणावर काम सुरू केलेलं. शिक्कामोर्तब केलेलं, तेव्हा त्याचवेळी उद्धजींच्या सरकारने इथेही ५० टक्के कर सवलत जाहीर केलेली.
हेही वाचा >> दोन पत्र... अण्णा हजारे केजरीवालांवर का रागावले?
मग ती जी मातोश्रीची भेट होती, ती नेमकी कशासाठी होती? खोक्यांची चर्चा झाली की कंटेनरची चर्चा झाली? म्हणून मद्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन काय आहे, या प्रश्नाचे उत्तर पहिले उद्धवजी आणि त्यांच्या कामगाराने आम्हाला दिलं पाहिजे. काल मफलरला अटक झाली. आता येणाऱ्या दिवसामध्ये मानेचा पट्टा लावणाऱ्याला जर अटक झाली, तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही", असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात ठाकरे रडारवर
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कमकुवत करण्यासाठी भाजपकडून नेत्यांना आपल्या बाजूने घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर अनेक नेतेही भाजपमध्ये गेले आहेत. मात्र, भाजपच्या मिशन 45 साठी अपेक्षित वातावरण तयार झालेले नसल्याचे ओपिनियन पोलमधून समोर आले आहे. महाविकास आघाडीचे आव्हान महायुतीसमोर दिसत असून, आता भाजपकडून प्रामुख्याने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जाईल, असे राजकीय विश्लेषक आणि राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरेंना ऐन निवडणुकी घेरण्याच्या तयारीत भाजप दिसत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT