Maharashtra Opinion Poll: ठाकरेंची शिवसेना जिंकणार महाराष्ट्रातील 'एवढ्या' जागा, ही आहे संपूर्ण यादी!
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा बराच कस लागणार आहे. India Tv- CNX ओपिनियन पोलमध्ये पाहा ठाकरेंना किती जागा देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 Maharashtra Opinion Poll BJP: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलं आहे. कारण ज्या पद्धतीने 2022 साली येथील सरकार पडलं त्यानंतर सगळी राजकीय गणितं बदलून गेली आहेत. अशावेळी भाजपला आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार याबाबत आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. असाच अंदाज . India Tv- CNX ओपिनियन पोलमध्येही वर्तवण्यात आला आहे. (india tv cnx maharashtra opinion poll shiv sena ubt thackeray group to win total 8 seats in maharashtra see the full list lok sabha election 2024)
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत महाराष्ट्राची सत्ता काबिज केली होती. तर 2022 साली एकनाथ शिंदेंना हाताला धरून भाजपने शिवसेनेत बंड घडवून आणलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. पण त्यांना तेवढाच फटका बसला नाही. तर त्यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ते या सगळ्या राजकारणात गमावून बसले. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे चिन्ह घेऊन जनतेसमोर जावं लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे गटाच्या पारड्यात किती जागा टाकतं याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये भाजप मोठं यश मिळवेल असा अंदाज आहे. पण भाजपपाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा असेल असा अंदाज आहे.