Abhishek Ghosalkar ची हत्या! अजित पवार म्हणाले, "ते दोघं..."
Abhishek Ghosalkar shot dead by Mauris Noronha : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. पवार नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT
Abhishek Ghosalkar shot dead by Mauris Noronha : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. पवार नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar on Abhishek Ghosalkar Murder case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. (Ajit Pawar First Reaction on Abhishek Ghosalkar shot dead)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "दहिसर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना महाराष्ट्रात घडताच कामा नये; त्या घटनेत काही मिनिटांचे व्यवस्थित संभाषण सुरू असल्याचे दिसत आहे. घोसाळकर उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे या घटनेचा नीट तपास झाला पाहिजे."
राजीनाम्याचा प्रयत्न केला जाईल -अजित पवार
अजित पवार म्हणाले, "या दोघांमध्ये नक्की काय झालं? हे समोर आयला हवं. या घटनेवरून विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करत आहेत. राजीनामा मागण्याचा प्रयत्न केला जाईल. पण चौकशीतूनच तथ्य समोर येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चर्चा केलेली आहे. लवकरच सत्य समोर येईल", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
हे वाचलं का?
"काल झालेली घटना (अभिषेक घोसाळकर हत्या) ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना कुठेही घडू नयेत. बाहेर पोलीस यंत्रणा असेल आणि आत दोन जण बसलेत. ते त्यांच्या धंदापाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने करत आहेत."
"दोघांचं संभाषण चांगलं चाललंय, नंतर अचानक मॉरिसने ते कृत्य केलं. त्यामुळे या घटनेचा नीट तपास झाला पाहिजे. ती घटना नीट पाहा. दोघं इतके चांगले गप्पा मारतायत चर्चा करतायत. अचानक मॉरिस बाहेर गेला. फेसबूक लाइव्हदरम्यान तो बोलत असताना त्याच्या मनात दुसरं काहीतरी चाललं होतं. आणि तिथून उठल्यानंतर असं करायचं, हे त्याने ठरवलं असलं तरी चेहऱ्यावर मात्र काहीच दिसत नाही", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT