'शरद पवारांनी शिवसेना संपवली' या फुटीर गटाच्या आरोपावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी याबाबत नेमकं काय उत्तर दिलं.. वाचा सविस्तर बातमी
What is Uddav Thackeray's reply to the rebel group's allegations that Sharad Pawar has ended the Shiv Sena?
What is Uddav Thackeray's reply to the rebel group's allegations that Sharad Pawar has ended the Shiv Sena?फोटो-इंडिया टुडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड, त्यांनी मुख्यमंत्री होणं, भाजप, हिंदुत्व, महाविकास आघाडी या सगळ्याबाबतच उद्धव ठाकरेंनी उत्तरं दिली. शरद पवारांनी शिवसेना संपवली असा आरोप बंडखोरांनी केला आहे. त्यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे शरद पवारांवर जो आरोप फुटीर गटाने केलाय त्याबाबत काय म्हणाले?

फुटीर गटाचा हा आक्षेप आहे की शरद पवारांनी शिवसेना संपवली त्याबाबत काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की आज जे गावोगावी दिसतंय ते काय आहे? शरद पवारांवर टीका केली जाते. आधी भाजपसोबत होतो तर भाजपकडून त्रास दिला जात होता हा आरोप झाला. राजीनामे तेव्हा खिशात ठेवले होते. त्यांची ती क्लिपही व्हायरल झाली आहे. भाजपने वचन पाळलं नाही म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर आता काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत. मग मला हाच प्रश्न पडतो की त्यांना (फुटीर गटाला) नेमकं हवंय तरी काय?

फुटीर गटाला काय हवं? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

फुटीर गटाला काय हवं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलाय हे संजय राऊत यांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांची लालसा संपलेली नाही. स्वतःला मिळालेलं मुख्यमंत्रीपद हे त्यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मिळवलं. शिवसेना प्रमुखांबरोबर आता तुलना करत आहेत. हे बघितल्यावर भाजप त्यांना आपल्यात विलीन करून घेतील वाटत नाही. कारण उद्या ते पंतप्रधान पद मागतील आणि नरेंद्रभाईंवर दावा सांगतील.

लालसा किंवा चटक ही अत्यंत वाईट असते. अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो मात्र मला चटक लागली नाही. जे लोक निघून गेले ते गेल्या निवडणुकीत पडले असते तर काय झालं असतं हा विचार मी करतो. तेव्हा पडले असते ते आता पडले असं मी मानतो हेही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.शरद पवार यांच्यावरही टीका करणाऱ्या बंडखोरांनाही त्यांनी उत्तर दिलं.

इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार फुटले हे स्पष्ट झालं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? हे विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की मी ऑपरेशन झाल्यानंतर यांना भेटू शकलो नव्हतो. इतर वेळी हे माझ्या कुटुंबासारखेच होते. निधी वगैरे व्यवस्थित वाटप केलं होतं. तसंच आमच्यात म्हणजे शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आमची चर्चा सुरू होती. अशोक चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही चर्चा केली होती. सगळ्या आमदारांना आणि अधिकाऱ्यांना घेऊन बसत होतो. त्यानंतर विचारलं की काहीही तक्रार करत नव्हते.

या लोकांनी (एकनाथ शिंदे आणि गट) जे काही केलं ते डोळ्यात डोळे घालून केलं का नाही? जे करायचं होतं ते चुकीचं होतं. त्यांच्या मनात पाप होतं. त्यामुळेच त्यांनी जे केलं ते नजरेला नजर देऊन केलं नाही असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सगळे आमदार सुरतलाच का गेले? कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगण असं कुठेही गेले नाहीत.

उद्धव ठाकरे सुरतला गेले असते तर चित्र वेगळं असतं का? हे विचारलं असता मी कशासाठी तिथे जायचं?त्याने काय घडलं असतं? माझ्या मनात काहीही नव्हतंच मी त्यांना सातत्याने परत बोलवतच होतो. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार होतोच.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in