नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर बिहारच्या अन् देशाच्या राजकारणात पुढे काय होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिहारमध्ये मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. नितीश कुमार यांनी त्यांचा जुना मित्र पक्ष भाजपशी संबंध तोडण्याची ही दुसरी वेळ आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी 2013 मध्ये भाजपशी फारकत घेतली होती. मात्र, 2017 मध्ये त्यांनी महाआघाडी सोडून भाजपशी मैत्री केली होती.

बिहारमध्ये आता जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीसह नवीन सरकार येणार आहे. मात्र, यावेळीही मुख्यमंत्री नितीशकुमारच असणार आहेत तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होऊ शकतात. तेजस्वी यादव यांनी गृहमंत्रालय देखील मागितले आहे. बिहारच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीचा परिणाम देशाच्या राजकारणावरही होणार आहे.

बिहारच्या राजकीय परिस्थितीचे महत्त्वाचे मुद्दे

1) नितीश कुमार असे नेते आहेत ज्यांचा राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नाही. नितीश कुमार यांनी यापूर्वी सत्तेसाठी अनेक आघाड्या केल्या आहेत. बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता असताना त्यांनी एनडीए सोडली आणि आरजेडीशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्यांनी आरजेडी सोडली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत पुन्हा आले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2) भाजपला सोडचिठ्ठी देऊन, आता नितीश कुमार RJDशी हातमिळवणी करून बिहारच्या राजकारणात टिकून राहणार आहेत. बिहारमध्ये सत्ताधारी आघाडीत ज्युनियर पार्टनर असूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले होते. नितीश कुमार यांना हाताशी धरुन भाजपचा आपला पाया मजबूत करण्याचा विचार होता. भाजपला बिहारमध्ये स्वत:चा मुख्यमंत्री बसवायचा होता अशी चर्चा आहे.

3) नितीश कुमार यांच्याकडे आता राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. नितीश कुमार यांचाही एक सिद्धांत आहे, NDA मधून बाहेर पडल्यामुळे आणि 2024 मध्ये काँग्रेसने फारशी चांगली कामगिरी केली नाही तसेच राज्याच्या नेत्यांनी हे ‘खिचडी सरकार’ एकत्र ठेवले तर 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उदयास येतील.

ADVERTISEMENT

4) 2022 चे नितीश कुमार 2013 च्या नितीश कुमारांच्या तुलनेत खूपच कमी आक्रमक झाले आहेत, कारण त्यांनी वारंवार यू-टर्न घेतला आहे. तेजस्वी यादव हे एक मजबूत विरोधी पक्ष नेते म्हणून उदयास आले आहेत आणि ते नितीश कुमारांवर पूर्ण विश्वास ठेवणार नाहीत. ते काहीतरी अटी टाकून सत्तेमध्ये बसायला तयार होतील.

ADVERTISEMENT

5) महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळल्यानंतर आणि नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर विरोधकांना बळ मिळेल. काँग्रेससाठी हा एक प्रकारचा सूड असणार आहे.

6) जातीय समिकरणं जुळवून बिहारमध्ये भाजपला नंबर एकच पक्ष करण्याचे भाजपचे स्वप्न आहे. नितीश कुमारांनी विश्वासघात केला हे लोकांसमोर सांगून ते जनतेचा विश्वास मिळवू शकतात.

7) अल्पावधीतच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नितीश कुमार यांचे जाणे आणि दुसरा मित्र गमावणे हा भाजपला धक्का मानला जात आहे. नितीश कुमारांशिवाय राष्ट्रीय निवडणुकीत उतरणे म्हणजे चुकीचा सामाजिक-राजकीय संदेश जाणे होईल. याची पक्षाला निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागू शकते, हे भाजपला माहीत आहे.

8) भाजप लालू यादव आणि विरोधी पक्षांविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी फळी आणि जंगलराज आठवणींना उजाळा देई शकते.

9) काँग्रेससारख्या पक्षांकडे बिहार आणि हिंदी भाषिक भागात मर्यादित पर्याय आहेत, पण ते मोठ्या स्थानिक पक्षांशी युती करून प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकतात.

10) नितीश कुमार यांच्यासमोर विरोधी पक्षात ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि गांधी यांचे आव्हान असणार आहे.

11) शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार मोडून काढण्यात भाजपने महाराष्ट्रात यशस्वी सत्तापालट करणे हे नितीश यांच्या वाटचालीला कारणीभूत ठरले.

12) नितीश कुमार पुन्हा लालू-तेजस्वी कॉम्बोमध्ये गेले आहेत, परंतु यावेळी, लालूंना अधिक फायदा आहे. कारण बिहार विधानसभेत त्यांची संख्या जास्त आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT