Tejashwi Yadav Marriage: तेजस्वी यादव यांनी गुपचूप उरकलं लग्न, पाहा कोण आहे नवरी मुलगी

मुंबई तक

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुपचूप आपलं लग्न उरकलं आहे. तेजस्वी यादव यांनी एअर होस्टेस असलेल्या अॅलेक्सिस हिच्याशी लग्न केले आहे. तेजस्वी आणि अॅलेक्सिस एकमेकांना 6 वर्षांपासून ओळखतात आणि जुने मित्र आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यांना साखरपुड्यानंतर दोन महिन्यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुपचूप आपलं लग्न उरकलं आहे. तेजस्वी यादव यांनी एअर होस्टेस असलेल्या अॅलेक्सिस हिच्याशी लग्न केले आहे. तेजस्वी आणि अॅलेक्सिस एकमेकांना 6 वर्षांपासून ओळखतात आणि जुने मित्र आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यांना साखरपुड्यानंतर दोन महिन्यांनी लग्न करायचं होतं. पण साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपलं लग्न आटोपलं.

तेजस्वी यांचा साखरपुडा आणि लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम दिल्लीतील सैनिक फार्ममध्ये पार पडला. हे सैनिक फार्म त्यांची बहीण मीसा भारती यांचे आहे. सैनिक फार्मच्या बाहेर आणि आत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जात आहे. प्रत्येक गेटवर वाहनाचा तपशील नोंदवला जात आहे. यासोबतच अनेक बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp