Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत?
बातम्या राजकीय आखाडा

Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत?

Sheetal Mhatre controversy :

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र हा व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच ठाकरे गटाच्या (uddhav Thackeray faction) आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप म्हात्रेंनी केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचे पुत्र राज सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापूर्वीही अनेकदा शीतल म्हात्रे चर्चेत आल्या आहेत. पण सातत्याने चर्चेत असणाऱ्या या शीतल म्हात्रे या नेमक्या आहेत कोण असा सवाल विचारला जात आहे. (Who is Shiv Sena Leader Sheetal Mhate? Why Sheetal Mhatre is in controversy)

कोण आहेत शीतल म्हात्रे?

शीतल म्हात्रेंकडे मुंबई शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं. राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी म्हात्रेंनी महिला पत्रकार म्हणून काम केलं आहे. त्यानंतर १३ वर्षांपूर्वी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातील शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी मिळाली.

पहिल्यांदा नगरसेवक :

२०१२ साली शीतल म्हात्रे पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे २०१७ सालीही म्हात्रे यांनी पुन्हा एकदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. उत्तर मुंबईच्या दहिसर वॉर्ड नंबर ८ मधून त्यांनी दोन्हीवेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील.

या दरम्यानच्या काळात म्हात्रे यांच्यावर पक्षांतर्गत जबाबदाऱ्याही मिळाल्या. शीतल म्हात्रे या अलिबाग आणि पेण येथील शिवसेनेच्या माजी संपर्कप्रमुख आहेत. याशिवाय दोन वेळा त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. तसंच मुंबई महापालिकेच्या कायदा (लॉ) समितीच्या सदस्य, राष्ट्रीय एड्स कंट्रोल सोसायटीच्या सदस्य अशाही जबाबदाऱ्या त्यांच्या वाट्याला आल्या.

sheetal Mhatre : व्हिडीओ व्हायरल, मध्यरात्री रंगलं नाट्य; शीतल म्हात्रे संतापल्या

शिंदेंच्या नेतृत्वाचा स्वीकार :

गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरेंचे नेतृत्व सोडून अनेकांनी शिंदेंच्या नेतृत्वाचा स्वीकार केला. यातच शीतल म्हात्रे यांनीही शिंदेंना साथ दिली. बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यात मी माझा खारीचा वाटा देत आहे, असं म्हणतं म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र बंडाच्या सुरुवातीला म्हात्रे ठाकरे गटामध्येच होत्या. त्यांनी स्वतः बंडखोर आमदारांविरुद्ध आंदोलन केलं होतं आणि भाषणही दिलं होतं.

Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं

विनोद घोसाळकर – शीतल म्हात्रे वाद :

काही वर्षांपूर्वी शीतल म्हात्रे विरुद्ध शिवसेना (UBT) नेते आणि दहिसरचे तेव्हाचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. एका आक्षेपार्ह कृतीतून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि धमकवल्याचा आरोप म्हात्रेंनी केला होता. “कोणीतरी शौचालयाच्या भिंतीवर माझा नंबर लिहिला, त्यामुळे अनेक लोकांनी मला फोनकरून त्रास दिला,” असा आरोप करत यामागे घोसाळकर आहेत असा दावा म्हात्रेंनी केला होता. जवळपास पाच वर्ष हे प्रकरण सुरु राहिल्यानंतर याप्रकरणी न्यायालयाने घोसाळकरांना दोषमुक्त केलं होतं.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात :

शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर दहिसर पोलिसांनी यातील संशयितांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५०९, ५००, ३४ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरूवातीला दोन जणांना ताब्यात घेतलं. मानस कुवर (वय 26) आणि अशोक मिश्रा (वय 45) अशी ताब्यात त्यांची नावं आहेत. त्यानंतर रविवारी एकाला शिवसैनिकांनी मारहाण करुन समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा इसम काँग्रेसशी (Congress) संबंधित असल्याचं सांगण्यात आलं.

Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून महिला आमदार भडकल्या, विधानसभेत गोंधळ

या तिघांचीही चौकशी सुरू असताना पोलिसांनी कल्याणमधून आणखी एकाला ताब्यात घेतलं. विनायक डायरे असं या तरुणाचं नाव आहे. अशात आता शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरणात मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी होत असताना पोलिसांनी दुर्गेंना ताब्यात घेतल्यानं खळबळ उडाली आहे.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!