BMC आयुक्त चहल ED च्या रडारवर आलेत, कारण… समजून घ्या प्रकरण काय?

दिव्येश सिंह

Commissioner Iqbal Singh Chahal and ED Case: मुंबई: मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) नोटीस बजावण्यात आल्यानंतर ते आज (16 जानेवारी) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. कोरोना काळात जे मुंबई महापालिकेने जे निर्णय घेतले त्याबाबत चहल यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोरोना (Corona) काळात मुंबईत जी कोव्हिड […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Commissioner Iqbal Singh Chahal and ED Case: मुंबई: मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) नोटीस बजावण्यात आल्यानंतर ते आज (16 जानेवारी) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. कोरोना काळात जे मुंबई महापालिकेने जे निर्णय घेतले त्याबाबत चहल यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोरोना (Corona) काळात मुंबईत जी कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospital) उभारण्यात आली त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे याच प्रकरणी आता थेट मुंबई महापालिका आयुक्तांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. (why bmc commissioner iqbal singh chahal has come under ed radar understand what is actual case)

मुंबईत जे जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले होते त्याची कंत्राटं ही संजय राऊतांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या कंपनीला दिला असल्याचा आरोप करण्यात आलं आहे. पुण्यातील एक जम्बो कोव्हिड सेंटर आणि मुंबईतील दोन सेंटरसाठी सुजित पाटकरांच्या कंपनीला कंत्राट दिली ज्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याच प्रकरणी आता आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची चौकशी करण्यात येत आहे.

संजय राऊत यांनी जामीन आदेश ऐकताच कोर्ट रुममध्ये काय घडलं? सुनिल राऊतांनी दिलं उत्तर

नेमकं प्रकरण काय?

ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये एक एफआयआर नोंदविण्यात आली होती. यामध्ये वेगवेगळ्या गंभीर कलमांन्वये सुजित पाटकर आणि लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीतील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp