BJP: ‘मरेपर्यंत भाजपसोबत जाणार नाही..’ नेमकी कोणी केली भीष्मप्रतिज्ञा?
Nitish Kumar big Statement on BJP Alliance: पटना: बिहारमधील (Bihar) सत्ताधारी JDU मधील राजकीय गदारोळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘मरेपर्यंत भाजपसोबत (BJP) जाणार नाही’, असं वक्तव्य आता नितीश कुमार यांनी केलं आहे. ‘मला मरण मान्य आहे, पण आता भाजपसोबत जायचे नाही.’ अशी मोठी घोषणाच नितीश कुमार यांनी केली […]
ADVERTISEMENT

Nitish Kumar big Statement on BJP Alliance: पटना: बिहारमधील (Bihar) सत्ताधारी JDU मधील राजकीय गदारोळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘मरेपर्यंत भाजपसोबत (BJP) जाणार नाही’, असं वक्तव्य आता नितीश कुमार यांनी केलं आहे. ‘मला मरण मान्य आहे, पण आता भाजपसोबत जायचे नाही.’ अशी मोठी घोषणाच नितीश कुमार यांनी केली आहे. (will not go with BJP till death cm nitish kumars big announcement)
नितीश कुमार म्हणाले की, ‘आम्ही अटलजींना मानणारे लोक आहोत.’ त्यांनी यावेळी असाही दावा केला की, ‘आम्ही भाजपला सोडलं होतं. पण ते स्वतः जबरदस्तीने आमच्यासोबत आले. 2020 मध्ये तर आम्हाला मुख्यमंत्री पदही नको होतं, पण त्यांनी काय केले ते सर्वांनी पाहिले. आम्ही त्यांना किती मान दिला. पण यावेळी निवडणूक होऊ द्या, कोण किती जागा जिंकतो हे सर्वांना कळेल.’ असं नितीश कुमार म्हणाले.
दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांची भेट, नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
नितीश कुमार यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा त्यांच्या पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. जेडीयूचे बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा उपेंद्र कुशवाह यांनी केला होता. यापूर्वी जेव्हा उपेंद्र कुशवाह यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांचा फोटोही काही भाजप नेत्यांसोबत समोर आला होता. यानंतर कुशवाह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आपण जेडीयूशिवाय कुठेही जात नसल्याचे कुशवाह यांनी सांगितले.