Mumbai Tak /बातम्या / BJP: ‘मरेपर्यंत भाजपसोबत जाणार नाही..’ नेमकी कोणी केली भीष्मप्रतिज्ञा?
बातम्या राजकीय आखाडा

BJP: ‘मरेपर्यंत भाजपसोबत जाणार नाही..’ नेमकी कोणी केली भीष्मप्रतिज्ञा?

Nitish Kumar big Statement on BJP Alliance: पटना: बिहारमधील (Bihar) सत्ताधारी JDU मधील राजकीय गदारोळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘मरेपर्यंत भाजपसोबत (BJP) जाणार नाही’, असं वक्तव्य आता नितीश कुमार यांनी केलं आहे. ‘मला मरण मान्य आहे, पण आता भाजपसोबत जायचे नाही.’ अशी मोठी घोषणाच नितीश कुमार यांनी केली आहे. (will not go with BJP till death cm nitish kumars big announcement)

नितीश कुमार म्हणाले की, ‘आम्ही अटलजींना मानणारे लोक आहोत.’ त्यांनी यावेळी असाही दावा केला की, ‘आम्ही भाजपला सोडलं होतं. पण ते स्वतः जबरदस्तीने आमच्यासोबत आले. 2020 मध्ये तर आम्हाला मुख्यमंत्री पदही नको होतं, पण त्यांनी काय केले ते सर्वांनी पाहिले. आम्ही त्यांना किती मान दिला. पण यावेळी निवडणूक होऊ द्या, कोण किती जागा जिंकतो हे सर्वांना कळेल.’ असं नितीश कुमार म्हणाले.

दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांची भेट, नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

नितीश कुमार यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा त्यांच्या पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. जेडीयूचे बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा उपेंद्र कुशवाह यांनी केला होता. यापूर्वी जेव्हा उपेंद्र कुशवाह यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांचा फोटोही काही भाजप नेत्यांसोबत समोर आला होता. यानंतर कुशवाह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आपण जेडीयूशिवाय कुठेही जात नसल्याचे कुशवाह यांनी सांगितले.

Jayant Patil :”एकनाथ शिंदे दोन-चार महिन्यांनी नितीश कुमारांसारखं करू शकतात, कारण…”

भाजप नितीशसोबत तडजोड करणार नाही- सुशील मोदी

याआधी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी म्हणाले की, ‘आता भाजप नितीश कुमार यांच्याशी कोणत्याही किंमतीत तडजोड करणार नाही. सुशील कुमार मोदी म्हणाले की, बिहार प्रभारी विनोद तावडे यांनीही राज्य कार्यकारिणीत स्पष्ट केले आहे की, नितीशकुमार हे आता कोणत्याही आघाडीसाठी ओझे बनलेले आहेत. नितीश यांची मतं मिळविण्याची क्षमता संपलेली आहे. 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये प्रचार केला नसता तर JDU 15 जागाही जिंकू शकलं नसतं. नितीश यांच्या जाण्याने भाजप खूश आहे.’ असं म्हणत सुशीलकुमार मोदींनी नितीश कुमारांवर जोरदार टीका केला आहे.

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…