Mumbai Tak /बातम्या / Virat Kohli: तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर विराट-अनुष्का महाकालच्या चरणी लीन
बातम्या स्पोर्ट्स

Virat Kohli: तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर विराट-अनुष्का महाकालच्या चरणी लीन

Virat kohli and anushka sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात भारताला (india) 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना थोडा धक्का बसला आहे. आता 9 मार्चपासून होणार्‍या अहमदाबाद (Ahmadabad) कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला अंतिम फेरीत (Final) सहज प्रवेश करण्याची संधी असेल. Star cricketer Virat Kohli reached Ujjain with his wife Anushka after the third Test defeat.

Virat Kohli चा अलिबागमधील 6 कोटींचा Luxury बंगला! पाहा Exclusive Photo

तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत उज्जैनला पोहोचला. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शनिवारी (04 मार्च) सकाळी महाकालच्या दरबारात हजेरी लावली. विराट आणि अनुष्कानेही भस्म आरतीमध्ये भाग घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ आणि पारंपरिक धोती घातली होती. यासोबतच त्यांच्या कपाळावर चंदनाचा लेपही लावलेला होता.

अलीकडच्या काही महिन्यांत विराट कोहली अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला आहे. विराट कोहली यावर्षी जानेवारी महिन्यात वृंदावनला गेला होता. यादरम्यान त्याने वृंदावनमध्ये श्री परमानंदजींचा आशीर्वाद घेतला होता. विशेष बाब म्हणजे वृंदावनहून परतल्यानंतर कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शतक झळकावले. विराट-अनुष्का जानेवारी महिन्यातच ऋषिकेशच्या दयानंद गिरी आश्रमात देखील पोहोचले होते. तिथे दोघांनी एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला होता.

Virat Kohli : सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहली तोडू शकतो का?

कोहली कसोटीत कधी फॉर्मात येईल?

34 वर्षीय विराट कोहलीची अलीकडची कसोटी क्रिकेटमध्ये बॅटने केलेली कामगिरी काही खास राहिलेली नाही. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. बघितले तर नोव्हेंबर 2019 नंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. म्हणजेच तीन वर्षांहून अधिक काळ भारतीय चाहते त्याच्या कसोटी शतकाची वाट पाहत आहेत.

कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू मालिकेत आतापर्यंत एकूण 5 पाच डाव खेळला आहे. ज्यामध्ये त्याच्या 22.20 च्या सरासरीने 111 धावा आहेत. ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही भाग घेतला होता, जिथे त्याच्या बॅटमधून फक्त 45 धावा निघाल्या होत्या.

विराट कोहलीचा कसोटी फॉर्म:

2020: 3 सामने, 116 धावा, 19.33 सरासरी

2021: 11 सामने, 536 धावा, 28.21 सरासरी

2022: 6 सामने, 265 धावा, 26.50 सरासरी

2023: 3 सामने, 111 धावा, 22.20 सरासरी

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा