Sourav Ganguly Corona Positive: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल
Sourav Ganguly Corona Positive: कोलकाता: बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. 49 वर्षीय सौरव गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टर त्याच्यावर सतत नजर ठेवून आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संकटादरम्यान ही बातमी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळेच सौरव गांगुलीचा कोरोना सॅम्पल आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी […]
ADVERTISEMENT

Sourav Ganguly Corona Positive: कोलकाता: बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. 49 वर्षीय सौरव गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टर त्याच्यावर सतत नजर ठेवून आहेत.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संकटादरम्यान ही बातमी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळेच सौरव गांगुलीचा कोरोना सॅम्पल आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे. जेणेकरून त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेली आहे की नाही हे तपासलं जाणार आहे.
याआधीही वर्षाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
जानेवारी 2021 मध्ये सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला काही दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर सौरव गांगुलीला महिन्यातून दोनदा अँजिओप्लास्टी (angioplasty) करावी लागली होती. मात्र, त्यानंतर तो बरा झाला होता आणि सतत काम करत होता. सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे.