Cricketer Of the year : सुर्यकुमारच्या तेजाने 2022 साली भल्याभल्यांना केल फेल

मुंबई तक

भारतीय संघाचा नवा उस्ताद सूर्यकुमार यादव उर्फ ​​सूर्या उर्फ ​​स्काय याबद्दल क्रिकेटच्या दिग्गजांनी आपले मत व्यक्त केले आहे. सध्याच्या क्रिकेट पाहणारे कोणीही हे नाकारू शकत नाही की २०२२ हे वर्ष सूर्यकुमार यादवचे वर्ष होते. या वर्षी त्याने पांढऱ्या चेंडूचा सध्याचा महान खेळाडू विराट कोहलीला सेकंड फिडल म्हणून ठेवलं आणि ज्यांनी दोघांचा खेळ जवळून पाहिला असेल, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय संघाचा नवा उस्ताद सूर्यकुमार यादव उर्फ ​​सूर्या उर्फ ​​स्काय याबद्दल क्रिकेटच्या दिग्गजांनी आपले मत व्यक्त केले आहे. सध्याच्या क्रिकेट पाहणारे कोणीही हे नाकारू शकत नाही की २०२२ हे वर्ष सूर्यकुमार यादवचे वर्ष होते. या वर्षी त्याने पांढऱ्या चेंडूचा सध्याचा महान खेळाडू विराट कोहलीला सेकंड फिडल म्हणून ठेवलं आणि ज्यांनी दोघांचा खेळ जवळून पाहिला असेल, तो दाव्याने म्हणू शकतो की ही भूमिका साकारण्यात विराटला कोणताही संकोच किंवा तक्रार नाही.

कोहलीसारखा खेळाडू, ज्याला आक्रमक आणि लक्ष केंद्रित करायला आवडते, तो आनंदाने सूर्याला साथ देणारा खेळाडू होताना दिसला. गेल्या वर्षभरात सूर्याची उंची अनेक पटींनी वाढली आहे हे पाहायला मिळालं. अनेक दिग्गज खेळाडूंनी सुर्याबद्दल भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या खेळाचे अनेकजण यावर्षी चाहते झाले आहेत. तर क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंनी सुर्यकुमारबद्दल काय मत व्यक्त केलेत, ते आपण पाहूया.

“सूर्या मैदानावर 360-डिग्रीमध्ये फटके मारतो. एबी डिव्हिलियर्सने त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना जसा खेळायचा, अगदी तसाच सुर्यकुमार खेळतो. लॅप शॉट्स, लेट कट्स, रॅम्प शॉट्स कीपरच्या डोक्यावरून खोळतो. तो सरळ शॉट्स देखील मारू शकतो. तो लेग साइडवर तितकाच चांगला खेळतो, खोल बॅकवर्ड स्क्वेअरवर चांगला फ्लिक करतो. तसेच तो वेगवान आणि फिरकी गोलंदाजीवर देखील चांगला खेळातो,” असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने सुर्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

“आम्ही आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतो त्यामुळे मी त्याचे अनेक इंनिग्ज पाहिल्या आहेत. पण मी पहिल्यांदाच त्याचा खेळ इतक्या जवळून पाहिला. मी भारावून गेलो. खरे सांगायचे तर मला वाटते की तो आज ज्या प्रकारे खेळतो, तो जर खेळत राहिला तर. त्याच झोनमध्ये, ते क्षणार्धात जगातील कोणत्याही संघाविरुद्ध खेळ बदलू शकतो.”असं विराट कोहली म्हणाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp